मुंबई विद्यापीठ : बीएससी आयटी निकाल जाहीर; ७६ % विद्यार्थी उत्तीर्ण 

मुंबई विद्यापीठ : बीएससी आयटी निकाल जाहीर; ७६ % विद्यार्थी उत्तीर्ण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) मागील ३० दिवसांत २२ पदवी परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यातच आता विद्यापीठातर्फे बीएससी आयटी सत्र ६ या महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर (BSC IT Semester 6 Exam Result Declared) करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.६० (76.60 Student Pass) एवढी आहे. परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे अधिकृत संकेयस्थळावर  www.mumresults.in प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

परीक्षेसाठी एकुण ७ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर प्रत्यक्ष परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ६९५ एवढी होती. या परीक्षेत एकूण ४ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बीएससी आयटी सत्र ६ च्या परीक्षेत १ हजार ३८१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे परीक्षेचा निकाल हा ७६.६० टक्के एवढा लागला आहे.

या परीक्षेला १८० विद्यार्थी हे अनुउपस्थित होते. तर ३२ विद्यार्थ्यांचा निकाल हा काॅपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आला आहे. प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने ८१४ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. शिवाय विविध कारणांमुळे प्रवेश निश्चित न झाल्याने ९४८ विद्यार्थांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. 

विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील जवळपास ७९ उन्हाळी सत्राचे निकाल जाहीर केले आहेत. तर मागील एक महिन्याभरात २२ पदवी परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात मुंबई विद्यापीठाने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.