INI CET निकाल 2024 घोषित 

AIIMS, JIPMER पुडुचेरी, PGIMER सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (INI) मध्ये MD, MS, DM (6 वर्षे), MCh (6 वर्षे) आणि MDS पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी INI CET 2024 स्कोअर वापरला जाईल.

INI CET निकाल 2024 घोषित 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (All India Institute of Medical Sciences)शनिवारी ( दि.25) INI CET निकाल 2024 (INI CET Result) घोषित केला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स एकत्रित प्रवेश परीक्षेसाठी बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- aiimsexams.ac.in वरून निकाल डाउनलोड करू शकतात. 19 मे रोजी झालेल्या परीक्षेत एकूण 45,360 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

AIIMS INI CET 2024 च्या निकाल पाहण्यासाठी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी त्यांची लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरावी लागतील. 50 टक्के गुण हे अनारक्षित (UR), EWS/प्रायोजित/प्रतिनियुक्त/परदेशी राष्ट्रीय/भारतीय परदेशी नागरिक (OCI) साठी पात्रता टक्केवारी आहे. तर OBC, SC, ST, PWBD आणि भुतानी राष्ट्रीय (फक्त PGI-चंदीगड) उमेदवारांसाठी, 45 टक्के गुण ही पात्रता टक्केवारी आहे.

AIIMS, JIPMER पुडुचेरी, PGIMER सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (INI) मध्ये MD, MS, DM (6 वर्षे), MCh (6 वर्षे) आणि MDS पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी INI CET 2024 स्कोअर वापरला जाईल.

निकाल कसा डाउनलोड करायचा?

*सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम AIIMS च्या अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जा.

* होमपेजवर AIIMS INI CET निकाल लिंकवर क्लिक करा.

* INI CET जुलै 2024 सत्र निकाल लिंकवर क्लिक करा.
* INI CET जुलै 2024 चा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
* निकाल डाउनलोड करा आणि पुढील गरजांसाठी प्रिंटआउट घ्या.