अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले ; तब्बल ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

राष्ट्रपती आणि प्रशासन खूप मेहनत घेत आहेत. असे हल्ले रोखण्यासाठी राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

अमेरिकेत भारतीय  विद्यार्थ्यांवर हल्ले ; तब्बल ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अमेरिकेमध्ये भारतीय आणि भारतीय अमेरिकन विद्यार्थ्यांवर (Indian American student) सातत्याने प्राणघातक हल्ले (Deadly attacks) होत आहेत. गेल्या दीड महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल ७ भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिकेत मृत्यू (7 Indian students die in America) झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय आणि भारतीय अमेरिकन विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहेत, असे आश्वासन जो बायडेन सरकारने (Joe Biden Govt) दिले आहे. राष्ट्रपती आणि प्रशासन (President and Administration) खूप मेहनत घेत आहेत, असे हल्ले रोखण्यासाठी राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

गेल्या दीड महिन्यापासून भारतीय आणि भारतीय अमेरिकन वंशाच्या विद्यार्थ्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरुच आहे. यामध्ये आतापर्यंत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून  २ विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. तर इतर तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू संशयस्पद अवस्थेत झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर व्हाईट हाऊसमधील नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधील स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समन्वयक जॉन किर्बी यांनी देशाच्या विविध भागात भारतीय आणि भारतीय अमेरिकन विद्यार्थ्यांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांदरम्यान ही माहिती देण्यात आली आहे. 

किर्बी म्हणाले, 'वंश, लिंग, धर्म किंवा इतर कोणत्याही कारणावर आधारित हिंसाचाराचे कोणतेही समर्थन सरकारकडून करण्यात येणार नाही. सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी बायडेन सरकारने एक संपूर्ण ब्लू प्रिंट तयार केली आहे, जी लवकरच लागू केली जाईल.' नोव्हेंबर 2023 च्या ओपन डोअर अहवालानुसार, अमेरिकेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी 25 टक्के विद्यार्थी मूळचे भारतीय आहेत. एका अहवालानुसार उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.