कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ; नागरी सहकारी बँकेत इंटर्नशिपची संधी 

पुणे , अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या अनेक  विद्यार्थ्यांना संधी मिळणार

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ; नागरी सहकारी बँकेत  इंटर्नशिपची संधी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University)संलग्न पुणे , अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये वाणिज्य (Commerce) शाखेत शिक्षण घेणाऱ्या अनेक  विद्यार्थ्यांना (students)आता नागरी सहकारी बँकांमध्ये (Co-operative Banks) इंटर्नशिप करण्याची संधी (Opportunity to do internship) प्राप्त होणार आहे,असे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर ( pro-Vice-Chancellor Dr. parag kalkar) यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वाणिज्य विभाग आणि पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी,  प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. जी. श्यामला यांच्यासह बँक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनिल करंजकर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा : 'एजुकेशनल ट्रिप' मध्ये मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याचा रोमँटिक फोटोशूट व्हायरल

काळकर म्हणाले, पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन आणि पुणे विद्यापीठ यांच्यात याबाबतचा नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार नव नवीन अभ्यासक्रम सुद्धा तयार केले जाणार आहेत. तसेच वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतानाच बँकांमधील कामाचा अनुभव प्राप्त व्हावा, या उद्देशाने गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठ व बँक असोसिएशनच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. आता करार झाल्यामुळे यापुढील काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घराजवळील नागरी सहकारी बँकेत इंटर्नशिप करता येणार आहे.

नागरी सहकारी बँकाना अनुभवी व कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी वाणिज्य विभागांशी संपर्क साधला होता. यानुसार विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाअंतर्गत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उत्तमरीत्या तयार करण्याकरिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम साकारण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा बँकेच्या कर्मचाऱ्यासोबतच वाणिज्य विभागांच्या विद्यार्थ्यांनाही लाभ होणार आहे. या अभ्यासक्रमातून वाणिज्य विद्यार्थी आणि बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये ज्ञाननिर्मितीसोबतच कौशल्य निर्माण करणे हा हेतू आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणातून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी  राष्ट्रासाठी मोलाची भर घालावी, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी यावेळी व्यक्त केली.