'एजुकेशनल ट्रिप' मध्ये मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याचा रोमँटिक फोटोशूट व्हायरल

मुलाच्या पालकांनी मुख्याध्यापिके विरोधात पोलिसात तक्रार करत कारवाईची मागणी केली.

'एजुकेशनल ट्रिप'  मध्ये मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याचा रोमँटिक फोटोशूट व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा होणारा लैंगिक छळ (sexual harassment) किंवा शिक्षेच्या नावाखाली केली जाणारी बेदम मारहाण, तर कुठे जाती किंवा धर्मावरून विद्यार्थ्यांना दिली जाणारी वाईट वागणूक अशा अनेक घटना घडल्याचे समोर येत. पण  'एजुकेशनल ट्रिप' ला (Educational Trip) गेलेल्या मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याचा रोमँटिक फोटोशूट (Headmistress and students romantic photoshoot) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral)होत असून नेटकरी या पोस्टवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

या फोटोशूटमध्ये दिसणारी महिला कर्नाटकातील चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला (Murugamalla in Chintamani taluka of Karnataka)गावातील सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका असल्याचे उघड झाले आहे.  तर तो विद्यार्थी त्याच शाळेत दहावी मध्ये शिकत असल्याचे समोर आले आहे. मात्र, हे प्रकरण उघड झाल्यानंतर मुलाच्या पालकांनी मुख्याध्यापिके विरोधात पोलिसात तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्याध्यापिकेवर एका अल्पवयीन मुलासोबत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. या दौऱ्या दरम्यान महिलेने आपल्या मोबाईलवर मुलासोबतचा फोटो क्लिक केला होता.

हेही वाचा : शिक्षण शिक्षक भरती : गणित विषयाच्या जागा रिक्ताच राहणार ; इतर विषयाच्या जागांचे काय होणार ?

या फोटोशूट वरून सोशल मीडियावर बराच गदारोळ निर्माण झाला आहे. नेटकरी या शिक्षिकेवर कारवाईची मागणी करत आहेत. काही लोकांनी कलियुग आल्याचे म्हटले आहे तर काही लोकांनी सोशल मीडियावर आरोप केले आहेत की, तेथे पोस्ट केलेल्या रील्समुळे तरुणांना चुकीचे काम करण्याची हिंमत मिळते.
दारम्यान, अमित सिंग राजावत यांनी हे फोटो आपल्या 'X ' अकौंट वर पोस्ट केली आहेत.