मदरशांचे शिक्षणही होणार आता ऑनलाईन 

समस्थ केरळ इस्लाम मठ विद्याभ्यास मंडळाद्वारे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

मदरशांचे शिक्षणही होणार आता ऑनलाईन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सतत नवीन आणि आधुनिक शैक्षणिक प्रयोग करण्यात अग्रेसर असणाऱ्या केरळ Kerala राज्याने धार्मिक शिक्षणात आणखीन एक प्रयोग केला आहे. धार्मिक शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा वयस्कर आणि इतर लोकांनाही मदरशांमध्ये (Madrasa)जाता येत नाही. अशा लोकांसाठी मदरशांचे ऑनलाईन शिक्षण (Madrasa education online )देण्यात येणार आहे. 

समस्थ केरळ इस्लाम मठ विद्याभ्यास मंडळाद्वारे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जे लोक धार्मिक शिक्षणासाठी मदरशांमध्ये जाऊ शकत नाहीत, असे लोक https://www.samasthaelearning.com किंवा वेब ऍप्लिकेशनवर लॉग इन करून या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतील. ऑनलाईन असणाऱ्या वर्गांसाठी त्यांची सोयीची वेळ निवडू शकतील. लाइव्ह क्लासेस कोझिकोड येथील समस्थ कार्यालयात कार्यालय सुरू करण्यात आले आहे. एक ई-लर्निंग किट देखील आणली जात आहे. धार्मिक शिक्षण सुरू ठेवू इच्छिणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी ' ई-लर्निंग ऑन गोइंग इज्युकेशन ' हा आणखी एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. 

उपक्रमांचा शुभारंभ करताना समस्थचे अध्यक्ष सय्यद जिफरी मुथुकोया थांगल म्हणाले की, "विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा उपयोग धार्मिक शिक्षणासाठी केला पाहिजे. जगभरातून ज्ञान मिळवण्याच्या सुविधांचाही वापर केला पाहिजे."