संशोधक म्हणून तुमच्यात पॅशन, पेशन्स आणि पर्सिस्टन्स या तीन गोष्टी हव्यात : डॉ. प्रमोद काळे

विविध संशोधनामुळे समाजाच्या अनेक समस्या सुटल्या आहेत.

संशोधक म्हणून तुमच्यात पॅशन, पेशन्स आणि पर्सिस्टन्स या तीन गोष्टी हव्यात : डॉ. प्रमोद काळे
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Savitribai Phule Pune University News : आपल्या संशोधनाचा समाजाला उपयोग व्हावा, यासाठी संशोधकाने प्रयत्नशील राहायला हवे, असे मत इस्रोचे (ISRO) शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. प्रमोद काळे (Pramod Kale) यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे (Pune) विद्यापीठात ‘अविष्कार -2023’ या १६ व्या विद्यापीठस्तरीय संशोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकार, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले, अविष्कार -2023 समितीचे अध्यक्ष डॉ. देविदास वायदंडे, डॉ. दिपक माने, अधिसभा सदस्य डॉ. धोंडीराम पवार, विद्यापरिषद सदस्य डॉ. संजय चाकणे, डॉ. के.सी. मोहिते, डॉ. प्रगती ठाकूर, डॉ. मोहन वामन आदी उपस्थित होते.

हेही वाचा : मेगा भरती : UPSC NDA, NA 2024 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू


विविध संशोधनामुळे समाजाच्या अनेक समस्या सुटल्या आहेत. त्यामुळे तुमच्या संशोधनाचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी संशोधकाने प्रयत्नशील राहायला हवे, असे डॉ. काळे यावेळी म्हणाले. तसेच संशोधक म्हणून तुमच्यात पॅशन, पेशन्स आणि पर्सिस्टन्स या तीन गोष्टी प्रामुख्याने असल्या पाहिजे, असेही ते यावेळी उपस्थित युवा संशोधकांचे संबोधन करताना म्हणाले. २०३५ पर्यंत सावित्रीबाई फुले विद्यापीठाला आपण संशोधन विद्यापीठ म्हणून बघण्याचा प्रयत्न करतो आहे. आविष्कार या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ९ वेळा विजेतेपद मिळाले आहे, त्यामुळे या स्पर्धेतील विद्यापीठाचे यश पाहता हा आत्मविश्वास वाढला असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकार यावेळी म्हणाले. याप्रसंगी पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक आणि अहमदनगर जिल्हातील विविध महाविद्यालयामधील विद्यार्थी त्यांच्या प्रकल्पासह सहभागी झाले होते.

तीन जिल्हातून ३५०० प्रकल्प

या स्पर्धेसाठी पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक (Nashik) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्हातील विविध महाविद्यालयातून जवळपास ३५०० प्रकल्प विद्यापीठाकडे आले होते. त्यानंतर झोनल पातळीवर परत स्पर्धा घेऊन एकूण २७३ प्रकल्पांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. एकूण सहा विभागात होणाऱ्या या स्पर्धेत शेवटी ४८ प्रकल्पांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर हे ४८ प्रकल्प जानेवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत सहभाग घेतील.