शिक्षक व पदवीधर 4 जागांसाठी निवडणुका, सुधारित कार्यक्रम जाहीर 

दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी २६ जून रोजी ही निवडणूक पार पडणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.  मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघाचा यामध्ये समावेश आहे. 

शिक्षक व पदवीधर 4 जागांसाठी निवडणुका, सुधारित कार्यक्रम जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या तोफा थंडावल्या नाही तोच आता विधानपरिषदेच्या (vidhanparishad) ४ जागांसाठी निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी आयोगाकडून (Election Commission) सुधारित कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी २६ जून रोजी ही निवडणूक पार पडणार (This election will be held on June 26) आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.  या पूर्वी १० जून मतदान आणि १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघाचा यामध्ये समावेश आहे. 

या निवडणुकीसाठी आता नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघ अशा एकूण ४ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोकण आणि नाशिक या पदवीधर तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा समावेश असणार आहे. या चार जागांसाठी ३१ मे ते ७ जून दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू असणार आहे. १० जून रोजी प्राप्त झालेल्या अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तर १२ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहे.  प्रत्यक्ष मतदान हे २६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार आहे तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, अशा प्रकारे नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

या कारणामुळे निवडणुक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला.. 

दरम्यान, सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने 10 जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम झाला असता , असा शिक्षक संघटनांचा दावा होता. त्यामुळे, ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. तसेच याबाबत न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती.  निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या, आता निवडणूक आयोगाने नव्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीचा सुधारित  कार्यक्रम जाहीर केला आहे.