सकाळी नऊच्या शाळेला स्कूलबस चालकांचा विरोध; पालकांना भूर्दंड, भाडेवाढीचा इशारा

सरकरने जर निर्णय बदलला नाही आणि बस मालकांना ही वेळ सक्तीची केली, तर स्कूल बस मालक संघटना स्कूलबस भाडे 25 ते 40 टक्के वाढविण्याची शक्यता.

सकाळी नऊच्या शाळेला स्कूलबस चालकांचा विरोध; पालकांना भूर्दंड, भाडेवाढीचा इशारा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सकाळी नऊ किंवा नऊ वाजल्यानंतर भरवण्याचा निर्णय सरकारने (Gov. rules) घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा फटका पालकांच्या खिशाला बसण्याची शक्यता आहे. कारण शासनाने निर्णयात बदल केला नाही आणि बस मालकांना (School Bus Owners) वेळेची सक्ती केली, तर स्कूल बस मालक संघटनेकडून (School Bus Owners Association) स्कूल बसच्या भाड्यात (School bus fare increase) 25 ते 40 टक्के वाढ केली जाणार आहेत. परिणामी याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फटका पालकांनाच बसणार आहे.

राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे वर्ग सकाळी नऊ वाजल्यानंतर भरवले जातील, याबाबतची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती.त्याबाबतचा अध्यादेशाही प्रसिध्द झाला आहे. मात्र, या निर्णयाचा स्कूलबस मालकांनी कडाडून विरोध केला आहे. शिक्षण विभागाने चर्चा न करता सकाळी नऊ नंतर शाळा सुरू करण्याचा  निर्णय घेतल्याने या निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचण येत असल्याचे  स्कूलबस मालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने या निर्णयावर फेरविचार न केल्यास भाडे वाढ करण्याचा इशारा स्कूलबस मालकांनी दिला आहे.
-----------------------------------

दोन शिफ्टमध्ये होणारा खर्च याचे सर्व गणित काढून भाडे स्कूल बसचे भाडे निश्चित केले जाते. या निर्णयामुळे एकाच शाळेला गाडी उपलब्ध होणार आहे. दोन शिफ्ट मध्ये बसने मुलांना ने आण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे बसच्या खर्चाचे गणित बिघडणार आहे. पालक, शाळा, बस मालकांचा विचार न घेता परस्पर हा निर्णय घेतला आहे. शासनाने  निर्णय मागे घेतला नाही तर भाडे वाढवल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे याचा फटका पालकांना बसेल. या निर्णयाला आमच्यासह  शाळा आणि पालकांचा  सुध्दा विरोध आहे. 
-राजेश जुनावणे ,  अध्यक्ष , बस /कार मालक असोशियन, पुणे