शाळेत मुलांचं वागणंं, अभ्यास अन् पालकांची तारेवरची कसरत! या गोष्टींकडे असूद्या लक्ष...

सर्वांचा ताण आपोआप पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर येतो. ही खरंच खूप मोठी समस्या आहे का, यातून मार्ग कसा काढायचा, मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची  या प्रश्नाची उत्तरे बाल समुपदेशिका डॉ. अर्चना नरवानी यांनी दिली.

शाळेत मुलांचं वागणंं, अभ्यास अन् पालकांची तारेवरची कसरत! या गोष्टींकडे असूद्या लक्ष...
Parents to make studying fun for children

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शाळा (School Education) नुकत्याच सुरु झाल्या आहेत. आता पुढील काही दिवसात शाळांमधून शिक्षक-पालकांच्या (PTA) बैठका सुरु होतील. यावेळी बहुतेकवेळा शिक्षक (School Teachers) विद्यार्थ्यांबद्दल त्यांच्या पालकांकडे (Parents) तक्रारी करताना दिसतात. मुलांचे हस्ताक्षर चांगले नाही, मुलांचा लिहिण्याचा वेग कमी आहे, मुलगा वर्गात एकेठिकाणी बसत नाही, तुमची मुलगी वर्गात इतर विद्यार्थ्यांशी मिळून मिसळून वागत नाही, अशा अनेक तक्रारी शिक्षक करत असतात. या सर्वांचा ताण आपोआप पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर (School Students) येतो. ही खरंच खूप मोठी समस्या आहे का, यातून मार्ग कसा काढायचा, मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची  या प्रश्नाची उत्तरे बाल समुपदेशिका डॉ. अर्चना नरवानी (Dr. Archana Narwani) यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना दिली. 

डॉ. नरवानी म्हणाल्या, "वास्तविक पाहता कुठलेच मूल प्रॉब्लेमॅटिक नसते, प्रत्येक मूल हे वेगळे असते. ते स्वतःची काही वैशिष्ट्य घेऊन जन्माला येते. पण जर एखादे ठराविक मूल इतर मुलांप्रमाणे नसले तर मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, असे सरसकट बोलले जाते. पण प्रत्येक मुलाची ग्रास्पिंग पॉवर, त्याचा इंटरेस्ट, त्यांच्या अभ्यासाची पद्धत वेगळी असू शकते. ही गोष्ट पालकांनी आणि शिक्षकांनी समजून घेतली पाहिजे." 

मान्सूनची हजेरी! मुलांना शाळेत पाठवताना काय घ्याल काळजी?

अभ्यास करत असताना मोबाईल टाळा

मुले अनुकरणातून शिकत असतात. त्यामुळे मुलांना मारून किंवा त्यांना भीती दाखवून अभ्यासाला बसवण्यापेक्षा त्यांच्या अभ्यासाच्या वेळेत पालकांनी  स्वतः त्यांच्यासोबत बसावे. सध्या 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना रुजत आहे. अशा वेळेस आपण काम करत असताना मुलांनाही आपल्यासोबत थोडावेळ अभ्यासासाठी बसवावे. किंवा मुले अभ्यासाला बसली कि आपण त्यांच्यासोबत एखादे पुस्तक वाचत बसले पाहिजे. त्यावेळी टीव्ही, मोबाईल टाळावे. त्यामुळे मुले सुद्धा पालकांचे अनुकरण करत आपापला अभ्यास करू लागतील, अशा सुचना डॉ. नरवानी यांनी पालकांना दिल्या.

अभ्यासाची ठराविक पध्दत लादू नका

मुलांच्या दैनंदिन अभ्यासाच्या वेळा निश्चित कराव्यात. त्यांना खूप वेळ अभ्यासाला बसवून त्यांना कंटाळा येईल असे करू नये. त्यांना अभ्यासानंतर किंवा आधी थोडासा ब्रेक टाइम द्यावा. मुलांच्या अभ्यासाच्या जागा निश्चित करा. त्या जागेवर तसे वातावरण निर्माण करा. शक्य असल्यास मुले जिथे अभ्यासाला बसत असतील त्या ठिकाणी एखादा छोटासा ब्लॅकबोर्ड, चित्र, पाढे किंवा गणिताचे तक्ते लावावेत. काही मुलांना शांतपणे वाचून समजते तर काही मुलांना मोठमोठ्याने वाचन करत अभ्यासाची सवय असते. त्यांच्यावर अमुक एक पद्धत लादण्याचा प्रयत्न करू नका.

शाळा सुरु झाल्या, मुलांना डब्यात काय द्यायचे? बाल आहार तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

मुलांसमोर वाद घालू नका

मुलांच्या अभ्यासात सहभागी व्हा. त्यांचे आवडीचे विषय, एखादा विषय समजून घेताना त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला समजत नसेल तर विषय किंवा एखादा धडा, प्रश्न युट्युब सारख्या माध्यमातून आधी तुम्ही समजून घ्या आणि मग मुलांना समजावून सांगा, मुलांसमोर घरातील मोठ्यांनी वाद घालायचे, घरातील एखाद्या गंभीर प्रश्नावर चर्चा करणे आदी गोष्टी टाळाव्यात. मुलांच्या योग्य आहार, चांगली झोप याकडे विशेष लक्ष द्यावे, " अशा सूचना डॉ. नरवानी यांनी पालकांना दिल्या.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2