NEET UG परीक्षेचा पेपर 50 लाखांना विकला; पुन्हा होणार का परीक्षा ? 

NEET UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थना 30 ते 50 लाख रुपयांना विकल्या गेल्या होत्या.

NEET UG परीक्षेचा पेपर 50 लाखांना विकला; पुन्हा होणार का परीक्षा ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशभरात 5 मे रोजी  झालेली NEET UG परीक्षा वादात सापडली आहे. परीक्षेचे पेपर लिक झाले (paper was leaked) होते,अशी माहिती पोलीस चौकशीतून समोर येत आहे.मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सी  (NTA) ने ही बाब नाकारली होती. अशातच आता बिहार राज्य पोलिसांच्या इकॉनॉमिक सायंटिफिक युनिटच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. NEET UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थना 30 ते 50 लाख रुपयांना विकल्या गेल्या होत्या.

दरम्यान, दिल्ली, राजस्थान, बिहार, गुजरात अशा विविध राज्यातून पेपर लिक झाल्याच्या बातम्या समोर येत असल्यामुळे NEET UG परीक्षा पुन्हा घेतली जाईल, अशी शक्यता वार्तवली जात आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार या प्रकरणात आता पर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. आता राजस्थान आणि बिहार राज्यातूनही पेपर लिक झाल्याची माहिती समोर येत आहे. बिहार पोलिसांच्या इकॉनॉमिक युनिटने केलेल्या तपासानुसार, पोलिसांनी अमित आनंद आदींसह इतरही आरोपींना अटक केली आहे, याशिवाय पोलिसांनी आरोपींचे १७ मोबाइल क्रमांकही उघड केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बिहार सरकारने चौकशी समिती नियुक्त केली आहे. 

नीट परीक्षेसाठी 5 मे रोजी देशभरतुन 24 लाखाहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. पण पेपर फुटल्याची प्रकरणे उघड होत असल्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुनरपरीक्षा घेतली जाईल,अशी शक्यता वार्तवली जात आहे. मात्र, या संदर्भात NTA कडून अद्याप काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.त्यामुळे परीक्षा रद्द होणार की नाही हे पुढील काही दिवसात  स्पष्ट होईल.