JEE मेन, CUET UG आणि NEET UG च्या तारखा 'जैसे थे' ; UGC ची माहिती

निवडणुकीमुळे JEE मेन, CUET UG आणि NEET UG परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याची माहिती UGC सचिव मनीष जोशी यांनी दिली आहे.

JEE मेन, CUET UG आणि NEET UG च्या तारखा 'जैसे थे' ; UGC ची माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

JEE मेन, CUET UG आणि NEET UG परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) मोठी बातमी आहे. येत्या काही दिवसांत या  परीक्षा असून लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याची माहिती UGC सचिव मनीष जोशी (Secretary Manish Joshi) यांनी दिली आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार JEE मुख्य सत्र 2 च्या परीक्षा 4  ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित केले जाणार आहे आणि NEET UG परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित केली जाणार आहे. याशिवाय CUET UG परीक्षा 15 ते 31 मे 2024 या कालावधीत होणार आहे. फक्त दोनच तारखा आहेत ज्यात बदल शक्य आहे, कारण निवडणुका 20 आणि 25 मे रोजी आहेत. या तारखेला परीक्षा देखील आहे, त्यामुळे बदल शक्य आहे, असेही जोशी यांनी सांगितले. 

जोशी यांनी  सांगितले आहे की, "NEET यूजी परीक्षा नियोजित वेळेनुसार 5 मे रोजी होईल.कारण त्या तारखेला निवडणुका होणार नाहीत."