चिमूरला राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे अधिवेशन

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या अधिवेशनास मंजुरी दिली असून राज्यभरातून सुमारे 5000 शिक्षकेतर कर्मचारी अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

चिमूरला राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे अधिवेशन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे (Maharashtra State Secondary School Non-Teaching Corporations) 52 वे राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर (Chimur in Chandrapur district)या ठिकाणी येत्या 19 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले .राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse)यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात विविध ठराव करण्यात येणार असून शिक्षण विषयक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे, असे महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर (Shivaji Khandekar) यांनी सांगितले.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या अधिवेशनास मंजुरी दिली असून राज्यभरातून सुमारे 5000 शिक्षकेतर कर्मचारी अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या काही वर्षात सोडविण्यात आले आहेत. परंतु, अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर शिक्षकेतर महामंडळाच्या अधिवेशनात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने शिवाजी खांडेकर यांनी केले आहे.