शिक्षक भरातीचा मार्ग मोकळा ; तात्काळ नियुक्त्या देण्याचे आयुक्तांचे आदेश 

ज्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्या जिल्ह्यांनी उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व स्प्रेडशीट मध्ये माहिती भरावी.

शिक्षक भरातीचा मार्ग मोकळा ; तात्काळ नियुक्त्या देण्याचे आयुक्तांचे आदेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणूकीच्या आचार संहितीमुळे (Lok Sabha Election Code of Conduct)रखडलेल्या शिक्षक नियुक्त्या (teacher appointments)जेथे लोकसभेचे मतदान पार पडले आहे,अशा जिल्ह्यात पूर्वत सुरू करण्याबाबत राज्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयाने निवडणूक आयोगाकडे (Election Commission)पाठ पुरावा केला होता.तसेच त्यात यशही मिळाले होते.मात्र, शिक्षक व पदवीधर निवडणुका (Teacher and graduate elections)जाहीर झाल्याने त्यात अडसर निर्माण झाला होता.परंतु, निवडणुका पुढे ढकल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षक नियुक्तीबाबत तत्काळ कार्यवाही करावी,असे आदेश शिक्षण आयुक्त सुराज मांढरे (Education Commissioner Suraj Mandre)यांनी दिले आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती राबवली जात आहे.भरतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.परंतु, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने नियुक्त्या रखडल्या होत्या.त्यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षण विभागाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता.त्यामुळे ज्या ठिकाणी लोकसभा मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे,अशा जिल्ह्यात शिक्षक नियुक्त्या देण्याबाबत शासनाकडून आदेश देण्यात आले होते.मात्र,निवडणूक आयोगाकडून शिक्षक व पदवीधर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक नियुक्त्या रखड्या होत्या. 

सर्व पात्र शिक्षकांना जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी नियुक्ती देण्याची शासनाचा प्रयत्न आहे.त्यानुसार शिक्षक नियुक्तीबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे.त्यात निवडणूक आयोगाने  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची 10 जून 2024 रोजी होणारी मतदानाची प्रक्रिया पुढे ढकलली आहे.त्यामुळे आचार  संहितेचा अडसर राहिला नाही.परिणामी आता कोणत्याही अडचणी शिवाय नियुक्ती प्रक्रिया सुरू होणार आहे. 

सूरज मांढरे म्हणाले, राज्यात काही जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे.आता उर्वरित जिल्ह्यात नियुक्तीची प्रक्रिया सुरू होईल.तसेच चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यावर त्या ठिकाणची शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 

---------------------------
विधान परिषदेच्या निवडणुका निवडणूक आयोगाने पुढे ढकललेल्या आहेत. त्यामुळे आता विधान परिषदेची आचारसंहिता लागू होणार नाही.त्यामुळे यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशानुसार ज्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्या जिल्ह्यांनी उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व स्प्रेडशीट मध्ये माहिती भरावी.याबाबत या शुक्रवारी संबंधित जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. 

- सूरज मांढरे , शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य