धक्कादायक :खासगी क्लासमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग, २ शिक्षकांवर गुन्हा दाखल
मागील वर्षभरापासून क्लासमधील शिक्षक प्रशांत खाटोकर यांनी तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कक्षात बोलावून घेत तिच्याशी अश्लील चाळे करत असे. विद्यार्थिनीने ही बाब क्लासचे संचालक विजय पवार यांना सांगितली व त्यांच्याकडे मदत मागितली. मात्र, विजय पवार यांनी खाटोकर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी स्वत: या विद्यार्थिनीशी आपल्या कक्षात अश्लील चाळे केले, असे तक्रारीत नमूद आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग (Molestation of a minor student) केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये (Umakiran Educational Complex) असलेल्या क्लासेसचे संचालक व शिक्षक अशा दोघांवर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी (Two teachers molested a student) बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Shivajinagar Police Station, Beed) करण्यात आला आहे. प्राध्यापक विजय पवार व प्रशांत खटावकर अशी त्यांची नावे आहेत.
पिडित विद्यार्थिनी ३० जुलै २०२४ पासून बीड येथील एका नामांकित खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत होती. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मागील वर्षभरापासून क्लासमधील शिक्षक प्रशांत खाटोकर यांनी तिला क्लास सुटल्यानंतर बोलावून घेत आणि तिच्याशी अश्लील चाळे करत असे. विद्यार्थिनीने ही बाब क्लासचे संचालक विजय पवार यांना सांगितली व त्यांच्याकडे मदत मागितली. मात्र, विजय पवार यांनी खाटोकर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी स्वत:या विद्यार्थिनीशी आपल्या कक्षात अश्लील चाळे केले, असे तक्रारीत नमूद आहे.
पवित्र पोर्टल : उमेदवारांच्या मुलाखती नियोजनासाठी संस्थांना आवश्यक सूचना
क्लासेस संपल्यानंतर प्रशांत खटावकर व विजय पवार हे या विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावत तिचा विनयभंग करत होते. जवळपास वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती लांडगे यांनी दिली. दरम्यान, बीडच्या शैक्षणिक वर्तुळात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.