पवित्र पोर्टल  : खासगी संस्थांना उमेदवारांच्या मुलाखतीसाठी पोर्टलावर नोंद करावी लागणार

व्यवस्थापनाने लॉगीन केल्यानंतर अॅप्लिकंट इंटरव्ह्यूव स्टेटस मेन्यू अंतर्गत सेड्यूल्ड इंटरव्ह्यूव यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट राउंड या ड्रॉपडाउन मधून फेज-2 रेग्यूलर राउंड निवडावा. यानंतर सिलेक्ट एज्युकेशन लेव्हल  यावर क्लिक करून प्राथमिक / माध्यमिक / उच्च-माध्यमिक / अध्यापक विद्यालय यापैकी स्तर निवडावा. यानंतर सिलेक्ट एड टाईप  मधून आपले पद निवडावे.

पवित्र पोर्टल  : खासगी संस्थांना उमेदवारांच्या मुलाखतीसाठी पोर्टलावर नोंद करावी लागणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या व्यवस्थापनांसाठी शिक्षण सेवक (Teacher Recruitment) या पदांसाठीची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी नुकतीच पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार ज्या उमेदवारांची ज्या शाळेकरिता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेली आहे. त्या उमेदवारांसाठी मुलाखतीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांसाठीची सेड्यूल्ड इंटरव्ह्यूव कार्यवाही पवित्र पोर्टलवर केल्याशिवाय व्यवस्थापनाला निवडीची कार्यवाही करता येणार नाही. त्यानुसार संस्थांना पवित्र पोर्टलवर आवश्यक सूचना प्रसिद्ध  (Notice published) करण्यात आली आहे.

पवित्र पोर्टलवर अशी राबवता येणार प्रक्रिया 

व्यवस्थापनाने लॉगीन केल्यानंतर अॅप्लिकंट इंटरव्ह्यूव स्टेटस मेन्यू अंतर्गत सेड्यूल्ड इंटरव्ह्यूव यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट राउंड या ड्रॉपडाउन मधून फेज-2 रेग्यूलर राउंड निवडावा. यानंतर सिलेक्ट एज्युकेशन लेव्हल  यावर क्लिक करून प्राथमिक / माध्यमिक / उच्च-माध्यमिक / अध्यापक विद्यालय यापैकी स्तर निवडावा. यानंतर सिलेक्ट एड टाईप  मधून आपले पद निवडावे. यानंतर सिलेक्ट मिडीयममधून पदाचे माध्यम निवडावे. पोस्ट या मेन्यूमधून पोस्ट निवडावी. 

यानंतर सिलेक्ट सबजेक्ट टाईपमधून विषय निवडावा. यानंतर मुलाखतीचे नियोजनानुसार आपण मुलाखतीचा दिनांक व स्थळ नमूद करावे. यानंतर सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या व्यवस्थापनाकडे मुलाखतीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या संपूर्ण तपशीलाची यादी दिसेल. यानंतर उमेदवारांच्या यादीतील सिरीयल नंबर या कॉलमपूर्वी असणाऱ्या चेक बॉक्सला क्लिक करून सेड्यूल इंटरव्हिव या बटनावर क्लिक केल्यानंतर उमेदवाराचा तपशील पॉपअपमध्ये दिसेल, तसेच येथे एस आणि नो अशी दोन बटने दिसतील. येथे एस या बटनावर क्लिक केल्यानंतर लगेच उमेदवारास आपण नियोजित केलेल्या मुलाखतीचा दिनांक व स्थळ याबाबतचा एस.एम.एस. प्राप्त होईल.

व्यवस्थापनास मुलाखतीच्या नियोजनात बदल करणे आवश्यक वाटल्यास केलेली कार्यवाही पुन्हा नव्याने करावी लागेल. मात्र सदरची कार्यवाही नव्याने करतेवेळी सेड्यूल्ड इंटरव्ह्यूव ऐवजी रि-सेड्यूल्ड इंटरव्ह्यूव यावर क्लिक करून वरीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबावी लागेल. उमेदवाराने लॉगीन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म मेन्यू अंतर्गत अॅप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट इंटरव्ह्यूव टाईप  या ड्रॉपडाउन मधून वुइथ इंटरव्ह्यूव मेन्यू निवडावा त्यानंतर सिलेक्ट राउंड या ड्रॉपडाउन मधून फेज -2 रेग्यूलर राउंड यानंतर सबमिट वर क्लिक करावे. 

त्यानंतर व्हयू रिकमेंडेड इंन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनांची नावे व त्यांनी नियोजित केलेल्या मुलाखतीचे स्थळ व मुलाखतीचा दिनांक दिसेल. व्यवस्थापनाने मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही करून उमेदवाराची अंतिम निवड विहित मुदतीत करावी. याबाबतच्या सूचना यापूर्वीच पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.