महिला व बाल विकास विभागाचा प्रोबेशन ऑफिसर पदाचा पेपर फुटला

आम्ही सरकारला वारंवार सांगतोय पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत तरी सरकारला एकही पेपर वाचवता आला नाहीये. प्रत्येक पेपर फुटतच आहे अजून काय पुरावा पाहिजे या बोगस सरकारला. निष्क्रिय गृहमंत्री आणि निष्क्रिय सरकार यांना मुलांच्या भविष्याच काहीच घेणे देणे नाहीये.

महिला व बाल विकास विभागाचा प्रोबेशन ऑफिसर पदाचा पेपर फुटला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

फेब्रुवारी 2025 या महिन्यात महिला व बाल विकास विभागातील (Women and Child Development Department) प्रोबेशन ऑफिसर या पद भरतीसाठी परीक्षा (Probation Office Post Recruitment Exam) टीसीएसने (TCS) घेतली होती. पेपर ऑनलाइन होता आणि पेपर सुरू असतानाच मायक्रो कॅमेरे द्वारे फोटो काढण्यात आले ते फोटो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीस (Competitive Examination Coordination Committee) प्राप्त झाले आहेत. पेपर फुटला हे 100% यावरून सिद्ध आहेच प्रश्न हा आहे की हे आता पर्यंत बाहेर आले नव्हते म्हणजे कोणालाच याबाबत शंका नव्हती असे प्रकार किती पेपर मध्ये झाला असेल आणि मुले बोगस रित्या लागली असतील याचा विचार न केलेला बरा, असे महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) यांनी म्हटले आहे. 

सुसंस्कृत, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची पिढी तयार करा, साधू संतांच्या विचारांचा समाज घडवा; अजित पवार

आम्ही सरकारला वारंवार सांगतोय पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत तरी सरकारला एकही पेपर वाचवता आला नाहीये. प्रत्येक पेपर फुटतच आहे अजून काय पुरावा पाहिजे या बोगस सरकारला. निष्क्रिय गृहमंत्री आणि निष्क्रिय सरकार यांना मुलांच्या भविष्याच काहीच घेणे देणे नाहीये. सर्व कारभार राम भरोसे आहे याना या खाजगी कंपन्याकडून बक्कळ पाकिटे मिळत असतील म्हणून या बोगस खाजगी कंपन्या आमच्या माथी मारल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्व परीक्षा घेण्यास तयार आहे पण बोगस सरकारला पाकीट कोण देणार? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. 

मंत्री आदिती तटकरी बघा आपल्या खात्याचा पेपर कसा फुटला आहे ते. ही मुलगी फक्त पेपर बाहेर काढण्याचे काम करते. लागणाऱ्या मुली दुसऱ्याच आहेत. या टोळी विषयी आम्हाला सर्व माहिती आहे जर सरकारची इच्छा असेल तपास करण्याची तर आम्ही सर्व माहिती देण्यास तयार आहोत पण माय बाप सरकार सर्व परीक्षा लवकरात लवकर MPSC कडे द्याव्यात. 

पोलिस यंत्रणा खूप निष्क्रिय आहे त्यांना पेपर फुटीचा तपास करता येत नाही आणि आरोपी तर पकडताच येत नाही. फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्या पासून पेपर फुटीचा 200 घटना झाल्या आहेत एक पण तपास पूर्ण नाहीये. हजारो आरोपी फरार आहेत. काही आरोपी तर फरार असून पण बोगस रित्या सरकारी नोकरीस लागले आहेत. काही तरी उपाय योजना करा सर्व गुन्हे एकत्र करून तपास करा आणि एक तपास करण्यासाठी स्पेशल विभाग तयार करा. तुमच्या नाकावर हे पेपर फोडत आहेत आणि मुलांच्या आयुष्याचे वाटोळे करत आहेत, असे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.