CBSE कडून दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचे तपशील जाहीर

येत्या 17 मे पासून अर्ज स्वीकारण्यास सुरू होणार असून 21 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.

CBSE कडून दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचे तपशील जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)दहावी , बारावीच्या पुरवणी परीक्षेची तारीख (10th, 12th Supplementary Exam Date)जाहीर केली आहेत. बारावीमध्ये एका विषयाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत,असे विद्यार्थी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज (Application for Supplementary Examination)करू शकतात. तर दहावी मध्ये जे विद्यार्थी दोन विषयात अनुत्तीर्ण आहेत,असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. CBSE कडून दहावी, बारावीसाठी पुरवणी परीक्षा येत्या 15 जुलै पासून घेतली जाणार आहे. इच्छुक पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात.

ज्या उमेदवारांना आपल्या विषयात आपले गुण वाढ शकततात आणि योग्य गुण मिळालेले नाहीत असे वाटते,असे  विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज भरू शकतात.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण बोर्डाने निश्चित केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण १०० गुणांपैकी किमान ३३ गुण मिळणे आवश्यक आहे. 80 गुणांची बाह्य परीक्षा आणि 20 गुणांची अंतर्गत मूल्यांकन असेल. अंतर्गत मूल्यांकन उत्तीर्ण करणे देखील बंधनकारक आहे.

पाच पैकी दोन विषयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसू शकतात. तसेच, अंतर्गत मूल्यमापनाचे सर्व विषय उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एक्सटर्नल परीक्षेत दोनपेक्षा जास्त विषयात आणि इंटर्नल ॲसेसमेंटमध्ये एका विषयातही अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसू दिले जाणार नाही. पुनर्मूल्यांकनाची लिंकही कार्यान्वित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात. गुण पडताळण्यासाठी पाच दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. येत्या 17 मे पासून अर्ज स्वीकारण्यास सुरू होणार असून 21 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. या दरम्यान विद्यार्थी गुणांची पडताळणी करून घेऊ शकतात.

CBSE दहावी, बारावी कंपार्टमेंट परीक्षा आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येईल.  यासाठी उमेदवारांना CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्यावी लागेल.