CUET PG परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध

कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेचे उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपापल्या विषयाच्या पेपरचे वेळापत्रक पाहू शकतात. 

CUET PG परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टींग एंजन्सीने  (NTA) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेच्या  (CUET-PG)  विषय निहाय परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध (exam timetable) केले आहे. pgcuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक उपलब्ध आहे. 

प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार  NTA 11 मार्च ते 28 मार्च या कालावधीत देशभरातील आणि भारत बाहेरील 24 शहरांमध्ये PG परीक्षा आयोजित करणार आहे. ही परीक्षा CBT (संगणक आधारित मोड) पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेसाठी उमेदवारांना जास्तीत जास्त चार चाचणी पेपर/विषय निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. परीक्षा तीन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते 10.45 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 12.45 ते 2.30 या वेळेत होणार आहे. तिसरी शिफ्ट दुपारी 4.30 ते 6.15 वाजेपर्यंत असेल. अधिकृत सूचनेनुसार CUET PG 2024 परीक्षा सिटी स्लिप परीक्षेच्या तारखेच्या सात दिवस आधी प्रसिद्ध केली जाईल. 

दरम्यान NTA ने CUET UG परीक्षा 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा  CUET- UG 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत सूचनेनुसार उमेदवार cuetug.ntaonline.in वर 26 मार्च पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यानंतर अर्ज विंडो बंद होईल.

सामान्य उमेदवारांना 1,000 रुपये आणि OBC, NCL, EWS उमेदवारांना CUET UG परीक्षेच्या पहिल्या तीन विषयांसाठी 900 रुपये भरावे लागतील. तर SC, ST उमेदवारांना 800 रुपये भरावे लागतील. तसेच अतिरिक्त विषयासाठी सर्वसाधारण उमेदवारांना 400 रुपये आणि ओबीसी, एनसीएलसाठी 375 रुपये, तर अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारांसाठी 350 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार पोर्टलला भेट देऊ शकतात.