CET 2024 : बी. एड सीईटीचा निकाल प्रसिद्ध; गुणपत्रक लॉग-इन मध्ये उपलब्ध

उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक त्यांच्या लॉग-इन मधून डाऊनलोड करता येणार आहेत. 

CET 2024 : बी. एड सीईटीचा निकाल  प्रसिद्ध;  गुणपत्रक लॉग-इन मध्ये उपलब्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Tactical Entrance Test) बी.एड या अभ्यासक्रमांसाठी (B.Ed Course) घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (CET)  4 मार्च ते 6 मार्च या कालावधीत पार पडली. त्यानंतर आता सीईटी सेलकडून बी.एड अभ्यासक्रमाचे गुणपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध (Mark sheet published on the website) करण्यात आहे. उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक त्यांच्या लॉग-इनमधून डाऊनलोड करता येणार आहेत. 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी उच्च शिक्षण विभागांतर्गत बी.एड या अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) दिनांक ४ मार्च ते ६ मार्च २०२४ या कालावधीत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात आली होती. सदर परीक्षेचे गुणपत्रक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना त्यांच्या लॉग-इन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी सूचना सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

असे डाऊनलोड करा गुणपत्रक 

प्रथम सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org. वर जा. त्यानंतर विचारलेला तपशील प्रविष्ट करुन आपले खाते लाॅग - इन करा.  गुणपत्रक तुमच्या समोर दिसेल. उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट काढून घ्यावी.