MH CET 5 वर्षांच्या  LLB परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल 

 MAH LLB 5-वर्षीय CET 2024 परीक्षेची तारीख 30 मे रोजी शेड्यूल करण्यात आली आहे.

MH CET 5 वर्षांच्या  LLB परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने MH CET 5 वर्षांची LLB परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. CET सेलने जारी केलेल्या सूचनेनुसार, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) UG 2024 आणि  LLB  परीक्षांच्या तारखा क्लॅश होत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.  MAH LLB 5-वर्षीय CET 2024 परीक्षेची तारीख 30 मे रोजी शेड्यूल करण्यात आली आहे.

यापूर्वी MH CET 5 वर्षांची LLB परीक्षा  22 मे रोजी जाहीर करण्यात आली होती आणि त्यापूर्वी ती 18 मे 2024 रोजी होणार होती. CET सेलने दिलेल्या माहितीनुसार  5 वर्षांच्या LLB परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी तारीख बदलण्याची विनंती केली होती. या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 MH CET 5 वर्षांची LLB  परीक्षेचे  प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना ई-मेल/एसएमएसद्वारे सूचित केले जाईल. प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर उमेदवारांना ते ऑनलाइन डाउनलोड करावे लागेल, अशी सूचना CET सेल कडून करण्यात आली आहे.