‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; पाचव्यांदा देता येणार परीक्षा

शैक्षणिक वर्ष २०२९-२० या काळात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांना भेटून पाचवी संधी देण्याची विनंती केली होती.

‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; पाचव्यांदा देता येणार परीक्षा
MBBS Examination Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एमबीबीएसचे (MBBS) प्रथम वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा (Examination) देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे (Students) शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२९-२० या काळात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांना भेटून पाचवी संधी देण्याची विनंती केली होती. कोविड विषयक तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पवार यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (NMC) पाठपुरावा व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या बाबत विस्तृत चर्चा केली होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा : शैक्षणिक संस्थांकडून लूट; मुलाखतीसाठी गेलेल्या भावी प्राध्यापकांकडून ५०० ते ७०० रुपयांची वसुली

आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये या विद्यार्थ्यांना पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र २०१९-२० या काळात कोविड या आजाराच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात आणि देशात लॉकडाऊन असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये बंद होती, त्यामुळे या काळातील एमबीबीएस चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता.

अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्याने विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून द्यावी, अशी भूमिका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी केंद्रीय वैद्यकीय आयोगापुढे (NMC) मांडली. याविषयी आयोगाने चर्चा केली आणि डॉ. पवार यांच्या भूमिकेला मान्यता देत या विध्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ही मान्यता दिली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2