CBSE चा बारावीचा निकाल जाहीर; ८७.९८ टक्के विद्यार्थी यशस्वी , यंदाही मुलीच आघाडीवर 

यंदा परीक्षेत ८७.९८ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.CBSE बोर्डाची बारावी टॉपर लिस्ट यावर्षी जाहीर होणार नाही.

CBSE चा बारावीचा निकाल जाहीर; ८७.९८ टक्के विद्यार्थी यशस्वी , यंदाही मुलीच आघाडीवर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीचा निकाल (CBSE 12th Result Declared)जाहीर केला आहे. यंदा परीक्षेत ८७.९८ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.CBSE बोर्डाची बारावी टॉपर लिस्ट यावर्षी जाहीर होणार नाही.

CBSE बोर्ड 12वीचा निकाल 2024 अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर पाहता येईल. CBSE बोर्ड निकाल 2024 उमंग आणि डिजीलॉकरवर देखील तपासले जाऊ शकतात. सीबीएसई बोर्डाचे निकाल मोबाईल ॲपवरही पाहता येतील. 

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६.४० टक्क्यांनी अधिक आहे. यावर्षी एकूण 17 लाख 041 विद्यार्थी बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेसाठी 7हजार 126 केंद्रे तयार करण्यात आली होती. CBSE हे देशातील एकमेव बोर्ड आहे जे 200 विषयांसाठी परीक्षा घेते. यंदा सीबीएसई बोर्ड १२वीच्या एकूण १ कोटी १० लाख ५० हजार २६७ प्रती तपासण्यात आल्या होत्या.

CBSE बोर्डाच्या निकालाच्या प्रेस रिलीझनुसार, तिरुअनंतपुरममध्ये उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. तेथील उत्तीर्णतेची टक्केवारी 99.91% इतकी नोंदवली गेली आहे. कोणतीही एक वेबसाइट क्रॅश झाल्यास, विद्यार्थी त्यांची तात्पुरती मार्कशीट इतर वेबसाइटवर तपासू शकतात, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान,बोर्डाने नुकतीच  results.cbse.nic.in वर  निकालाची तारीख जाहीर केली होती, त्यानुसार बोर्डाने 20 मे 2024 नंतर दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती दिली होती. मात्र, बोर्डाने सोमवारी 13 मे रोजी काही वेळापूर्वी निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही 10 वी - 12 वी चा नकाल एकच दिवशी जाहीर होण्याची शक्यता वार्तवण्यात येत आहे, असे घडल्यास आणखीन काही वेळात दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. 

-------------

असा पाहता येईल निकाल 

* CBSE बोर्डाचा १२वीचा निकाल पाहण्यासाठी cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

* वेबसाइटच्या होमपेजवर 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

* हे केल्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल. रोल नंबर, रोल कोड यासारखे तपशील येथे प्रविष्ट करा.
* CBSE बोर्डाचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.. ते नीट तपासा आणि डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.