नागपूरात विद्यार्थीनीचा विनयभंग; कुठे आहे कायद्याचा धाक, कुठे आहे सरकार: विजय वडेट्टीवार 

नागपूर महिलांसाठी सुरक्षित राहिले नाही, मग कायद्याचा धाक कुठे? सरकार कुठे?, असा सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  एक्स या आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट शेअर केली आहे.

नागपूरात विद्यार्थीनीचा विनयभंग;  कुठे आहे कायद्याचा धाक, कुठे आहे सरकार: विजय वडेट्टीवार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नागपूरमध्ये रिक्षाचालकाने एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राज्याची उपराजधानी (Deputy capital of the state) असलेले नागपूर महिलांसाठी सुरक्षित राहिले नाही, (Nagpur is no longer safe for women) मग कायद्याचा धाक कुठे? सरकार कुठे?, असा सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी  एक्स या आपल्या सोशल मीडिया (Social media) अकाऊंट वर पोस्ट शेअर केली आहे.

उपराजधानी नागपूर मधील ही घटना आहे. एक नराधम रिक्षाचालक शाळकरी मुलीचा भर रस्त्यात विनयभंग करताना व्हिडिओत दिसत आहे. उपराजधानी नागपूर आता गुन्हेगारांची राजधानी झाली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत.. राज्यातील लहान मुली देखील सुरक्षित नाही. प्रचंड संताप आणि चीड आणणाऱ्या अश्या महिला अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण महाराष्ट्रात वाढले असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. . 

या  घटनेचा तपशील असा की, दहावीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी शाळेतून नियमितपणे ज्या रिक्षातून घरी जायची, त्याच रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केला. २५ वर्षीय रिक्षाचालकाने मुलीला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला होता. त्याठिकाणी तिच्यावर विनयभंग करण्यात आला.  या घटनेचा साधारण ४० सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ देखील वडेट्टीवार यांनी ट्विट केला आहे. 

हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात संतापाची लाट उसळली आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे काही तासांतच ऑटोचालकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.. परंतु, घटनेमुळे धक्का बसलेल्या मुलीच्या पालकांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.