पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल; सरकारी शाळेतील शिक्षकांची प्रवेशासाठी धावपळ

पालकांचा सर्वांधिक कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे (English Medium Schools) असल्याचा दिसून येत आहे.

पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल; सरकारी शाळेतील शिक्षकांची प्रवेशासाठी धावपळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मे महिन्यात शाळांचे निकाल जाहीर (Results of schools announced) केले जातात. निकाल जाहीर झाल्याबरोबर पालक आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा या प्रयत्नात असतात. मात्र, पालकांचा सर्वांधिक कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे (English Medium Schools) असल्याचा दिसून येत आहे. असे असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा, याकरीता सरकारी शाळेतील (Government school) शिक्षकांची प्रचंड धावपळ (A huge rush of teachers) होताना दिसत आहे. 

अनेक पालकांचा इंग्लिश माध्यमाकडे कल दिसून येत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, खाजगी अनुदानित सेमी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी येथील शिक्षकांना भटकंती करावी लागत आहे. जर मान्य तुकडीची पटसंख्या कमी झाली. तर त्या तुकडीशी संबंधित शिक्षक अतिरिक्त होतो. मग आपल्या सहकाऱ्यापैकी कोणी अतिरिक्त होऊ नये, याकरीता शिक्षक विद्यार्थी प्रवेशाकरीता धावपळ करताना दिसत आहेत. 

आपल्या शाळेतील उत्कृष्ट उपक्रम तसेच दर्जा कसा उत्तम आहे, हे शिक्षक सांगताना दिसत आहेत. ज्या नावलौकिक (मोठया) शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात त्यामध्येही अधिक पटसंख्या कशी वाढेल, याकरीता शाळेची प्रसिद्धी करताना दिसत आहेत. मागील काही वर्षापासून सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होताना दिसत आहे. तर इंग्रजी माध्यमांची आव्वाच्या सव्वा फिस भरुन आपल्या पाल्यांना प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहेत.