'स्टाफ सिलेक्शन'ची तयारी करताय? तर भरती प्रक्रियेतील 'हे' बदल नक्की वाचा.. 

नवीन वेबसाइटवर नोंदणीसाठी SSC ने काही नियमांमध्ये नव्याने बदल केले आहेत. यामध्ये महत्वाचा बदल म्हणजे यापुढे तुम्हाला भरतीमध्ये लाइव्ह फोटो अपलोड करावा लागेल.

'स्टाफ सिलेक्शन'ची तयारी करताय? तर भरती प्रक्रियेतील 'हे' बदल नक्की वाचा.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्टाफ सिलेक्शन कमिशनने SSC नुकतीच ssc.gov.in ही नवीन वेबसाइट लॉन्च (New website launch) केले आहे. नवीन वेबसाइटवर नोंदणीसाठी SSC ने काही नियमांमध्ये नव्याने बदल (New changes in rules) केले आहेत. यामध्ये महत्वाचा बदल म्हणजे यापुढे सर्व SSC भरतीमध्ये लाइव्ह फोटो अपलोड (Live photo upload) करावा लागणार आहे. 

यासंदर्भात SSC ने प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, "नवीन भरतीसाठी उमेदवारांना नवीन वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. यादरम्यान त्यांना त्यांचे थेट छायाचित्र काढावे लागणार आहे. अर्ज करताना उमेदवाराला त्याच्या लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या वेबकॅमवरून किंवा मोबाईलवरून थेट फोटो अपलोड करावा लागेल. प्रवेशपत्रात होणाऱ्या गोंधळामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

उमेदवारांनी छायाचित्रे काढताना काय काळजी घ्यावी

वेबकॅमद्वारे फोटो काढताना उमेदवारांनी चांगली प्रकाश आणि साधी पार्श्वभूमी असलेली जागा शोधावी. फोटो काढण्यापूर्वी, कॅमेरा डोळ्याच्या पातळीवर असल्याची खात्री करा. स्वतःला थेट वेबकॅमच्या समोर ठेवा आणि सरळ पुढे पहा. लाइव्ह फोटो काढताना उमेदवारांनी टोपी, मास्क किंवा चष्मा लावू नये.

SSC च्या नवीन नियमानुसार CGL, CHSL, CAPF CPO, MTS, GD कॉन्स्टेबल, JE, JHT, स्टेनोग्राफर आणि इतर भरतींना लागू होईल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नवीन OTR  म्हणजे एक वेळ नोंदणी करावी लागेल.

एसएससी नोंदणी: नवीन वेबसाइटवर ओटीआर कसे करावे

सर्वात प्रथम SSC ssc.gov.in च्या या नवीन वेबसाइटला भेट द्या. मुख्यपृष्ठावर दिलेल्या 'लॉगिन/नोंदणी' लिंकवर क्लिक कराआणि नोंदणी हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमची नोंदणी करा. आपले वैयक्तिक तपशील योग्यरित्या भरा. OTP द्वारे तुमचा मोबाईल आणि ईमेलचा पडताळा करा. तुमचा पासवर्ड अपडेट करा, कोणतीही आवश्यक माहिती एंटर करा, अटींना सहमती द्या आणि सबमिट करा.