बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर काम करणाऱ्या अमृत संस्थेचे कामकाज ठप्प?

२०१९ स्थापनेपासुन या संस्थेने एकही योजना राबवली नाही. किंबहुना ही संस्था अस्तिवात आहे का हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे? संस्थेचे कार्यालय त्यांच्या योजनांची माहीती ना सोशल मिडीयावर ना वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर काम करणाऱ्या अमृत संस्थेचे कामकाज ठप्प?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बार्टी, सारथी, महाज्योती (Barty, Sarathi, Mahajyoti) यांच्या धर्तीवर काम करणारी अमृत संस्थाचे (Amrit Sanstha) अवघ्या काही वर्षात कामकाज ठप्प (Work stopped) झाले असल्याचा आरोप केला जात आहे. २०१९ मध्ये स्थापन झालेली ही संथ्या राज्य शासनाने मोठ्या धाटामाटात सुरु केली. मात्र, अवघ्या काही वर्षात संस्थेवर आर्थिक संकट ओढावले आहे. या संस्थेचा लाभ खूल्या प्रवर्गातील अर्थिकदृबल घटकातील विद्यार्थ्यासाठी होणार होता. परंतु, २०१९ स्थापनेपासून या संस्थेने एकही योजना राबवली नाही. किंबहुना ही संस्था अस्तिवात आहे का हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे? संस्थेचे कार्यालय त्यांच्या योजनांची माहीती ना सोशल मिडीयावर ना वेबसाईटवर उपलब्ध आहे. मग अशा संस्था व त्यांचे महासंचालक करतात तरी काय?, असा प्रश्न स्टुडंट हेल्पींग हँडस संघटनेचे (Student Helping Hands Association) कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे.मात्र सर्व आरोप बुनबुडाचे असल्याचे संस्थेच्या संचालकांकडून सांगितले जात आहे.

शासनाकडून मोठ्या उत्साहात संस्था सुरु केल्या जातात. बजेटमध्ये मोठ- मोठी आकडेवारी घोषीत केली जाते, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या हाती काहीही मिळताना दिसत नाही. या संस्थेमार्फत सध्या सहा योजना कार्यावत आहेत, असे सांगण्यात येते. परंतु,दूर्दैवयाची बाब म्हणजे यांचा एकही लाभार्थी नाही. mpsc, upsc विद्यार्थ्यांना मूलाखतीस मानधन देणे, कौशल्य विकास मार्फत नोकरी देणे, लघुउद्योगांना प्रशिक्षण देणे, कृषी उत्पन्न आधारीत उद्योग सुरु करणे, AIIMS आणी IIT विद्यार्थ्यांना अर्थसाहय्य करणे, अशा योजना आहेत.मात्र, त्यांची अंमलबजावणी केली जात नसलयांचा आरोप कुलदीप आंबेकर च्याकडून केला जात आहे.

__________________________________________

सर्व आरोप बिनबुडाचे व माहिती न घेता केलेले आहेत. यामध्ये काही एक तथ्य नसून चुकीची माहिती पेरली जात आहे. सर्व योजना चालू असून सध्या या संस्थेमार्फत १७०० ते १८०० विद्यार्थी लाभ घेत असल्याचे आहेत. तसेच संस्थेला निधीची कोणतीही कमतरता नाही.  

विजय जोशी , महासंचालक , अमृत संस्था