आर्यन पब्लिक स्कूलचे संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर फसवणुकीचा गुन्हा; शाळा अनधिकृत असल्याची तक्रार

हडपसर येथील अशोक श्रीरंग गोडसे (वय ५०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थाचालक आर्यन सुर्यवंशी उर्फ संतोष चौरे व मुख्याध्यापिका माधुरी सुर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आर्यन पब्लिक स्कूलचे संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर फसवणुकीचा गुन्हा; शाळा अनधिकृत असल्याची तक्रार
Aryan Public School

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील आर्यन पब्लिक स्कुलचे (Aryan Public School) संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा अनधिकृत असताना अधिकृत भासवून विद्यार्थ्यांना प्रवेश (Admission) दिले. त्यांच्याकडून भरमसाठी शुल्क वसुल केल्याची तक्रार पोलिसांकडे (Pune Police) करण्यात आली आहे. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हडपसर येथील अशोक श्रीरंग गोडसे (वय ५०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थाचालक आर्यन सुर्यवंशी उर्फ संतोष चौरे व मुख्याध्यापिका माधुरी सुर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आर्यन पब्लिक स्कुल शाळेचे संस्थापक व शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी यांची कोणत्याची कागदपत्रांची पुर्तता न करता शाळा सुरू ठेवली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

 

विद्यार्थ्यांची अनधिकृतरीत्या भरती करून, पटावर नोंदणी करून, विद्यार्थ्यांच्या पालकाकडून अनधिकृतरीत्या भरमसाठ फी वसुल करू, शाळा अनधिकृत असून सुध्दा अधिकृत असल्याचे भासवून विद्यार्थ्यांचे दाखले व इतर कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच इतर शाळांना शाळा सोडल्याचे दाखले मागणी करून शासनाचा महसुल बुडबून शासनाची, पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k