विद्यार्थी नाही तर आता सी-नेट सदस्यांचे आंदोलन 

विद्यापीठाची अधिसभेची बैठक सभागृहात नाही तर सभागृहाबाहेर होणार असल्याची चर्चा आहे.विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने काही सी-नेट सदस्यांनी सभागृहबाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थी नाही तर आता सी-नेट सदस्यांचे आंदोलन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन (students Strike) करत असल्याचे दिसून येत आहे.मात्र,आता विद्यार्थी नाही तर सी-नेट सदस्यच आंदोलन (c -net  members Strike) करणार असल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे विद्यापीठाची अधिसभेची बैठक (c -net meeting ) सभागृहात नाही तर सभागृहाबाहेर होणार असल्याची चर्चा आहे.विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने सी-नेट सदस्यांनी सभागृहबाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : शिक्षण विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण ; अधिसभा सदस्यांना आली जाग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.त्यात विद्यार्थी व विद्यापीठाशी निगडीत विविध विषयांवर चर्चा होणार आहे.अधिसभेची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली असून कार्यक्रम पत्रिकेतील मुद्यांचा विचार करता आधिसभा सदस्यांकडून विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांकडे केली जाणारी पैशांची मागणी, विद्यार्थ्यांचा जाहीर झालेला चुकीचा निकाल, प्रमाद  समितीकडून प्रकरणे निकाली काढण्यास होत असलेला विलंब, त्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान या घटनांमुळे आधिसभा सदस्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करावी,या मागणीसाठी सी-नेट सदस्यांकडून अनेक दिवस पाठपुरावा करण्यात आला.अखेर व्यवस्थापन परिषदेत मानधन वाढीची मागणी मान्य करण्यात आली. मात्र,त्याबाबत विद्यापीठाकडून अधिकृत घोषणा झाली नाही.तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवणाची सुविधा उपलब्ध नाही. मुलांच्या व मुलींच्या वासतीगृहांतील मेस बंद आहे.त्यामुळे अनेक मुलांना स्वयंसेवी संस्थेकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या खिचडी भातावर अवलंबून राहावे लागत आहे.ओपन कँटिन , ओल्ड कँटिन कायम स्वरूपी बंद करण्यात आल्या.अनिकेत कँटिन काही वर्षांपासून बंदच आहे.

फूड मॉलबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत.विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाची सुविधा नीटपणे करून देता येत नसेल तर विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी कसे येतील ? विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडूनही ते सुटत नसतील तर सभागृहात का कासायचे ? अशी भूमिका घेत काही सदस्यांनी संभागृहा बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे.
 विद्यापीठाचे सी-नेट सदस्यच जर बाहेर बसले तर सभागृह चालणार कसे ? त्यामुळे या सी-नेट सदस्यांची समजूत काढण्यात आणि त्यांना सभागृहाबाहेर बसण्यापासून रोखण्यात विद्यापीठ प्रशासन यशस्वी ठरते का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.   

----------------------

" विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रमाद समितीसमोर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न येऊ शकला नाही.परिणामी या विद्यार्थ्यांच्या निकालात वेळेत  दुरूस्ती होऊ शकली नाही.विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थी लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशस मुकले. या विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान कोणीही भरून काढू शकणार नाही.त्यामुळे मी सभागृहाबाहेर बसणार आहे." 

- गणपत नांगरे, सी-नेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे