मुख्याध्यापक संघ महामंडळाचे वार्षिक अधिवेशन जळगावात; अध्यक्षपदी प्राचार्य विजय पाटील

महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील व सचिव शांताराम पोखरकर यांनी ही माहिती दिली. अधिवेशनाच्या अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य विजय पाटील यांची निवड झाली आहे.

मुख्याध्यापक संघ महामंडळाचे वार्षिक अधिवेशन जळगावात; अध्यक्षपदी प्राचार्य विजय पाटील

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक  उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ (Principals Union Corporation) मुंबईचे ६२ वे वार्षिक अधिवेशन जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील फैजपूर येथे पार पडणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील  सचिव शांताराम पोखरकर यांनी ही माहिती दिली. अधिवेशनाच्या अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य विजय पाटील (Vijay Patil) यांची निवड झाली आहे.

 

अधिवेश दि. १८ व १९ नोव्हेंबर रोजी फैजपूरमधील जे. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, शिक्षण क्षेत्रातील नवीन विचारप्रवाह, शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ घातलेले बदल, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शालेय गुणवत्ता विकास यासारख्या विविध विषयांवर विचार मंथन  तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

फटाकेमुक्त दिवाळीसाठी राज्य सरकार आग्रही; विद्यार्थ्यांना दिली शपथ, जागृतीचे आवाहन

 

त्याचबरोबर अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रातील विविध विषयावरील शोध निबंध जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सादर करण्यात येणार आहेत. तसेच राज्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याध्यापकांचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे.

 

सदर अधिवेशन दीपावलीच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये होत असल्याने राज्यातील बहुसंख्य मुख्याध्यापकांनी अधिवेशनास येण्याचे नियोजन करून उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO