मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंग; सिनिअर विद्यार्थ्यांच्या रॅगिंगमुळे गेला जीव
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर काही सिनिअर विद्यार्थ्यांनी रॅगिंगमुळे १८ वर्षाच्या अनिल मेथानिया या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद केले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गुजरात मधील पाटणच्या (Gujarat Patan District News) वैद्यकीय महाविद्यालयातून (Student dies in medical college) धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर काही सिनिअर विद्यार्थ्यांनी रॅगिंग (Senior students committed ragging) केली. त्यामध्ये १८ वर्षाच्या अनिल मेथानिया या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर या प्रकरणी १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद केले, असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्यापेक्षा कनिष्ठ विद्यार्थ्यांना रात्री हॉस्टेलच्या रूममध्ये सुमारे साडेतीन तास उभे राहण्याची सक्ती केली होती. यामध्ये सहभागी असलेल्या अनिल याची साडेतीन तास उभे राहिल्यानंतर प्रकृती बिघडली. थोड्यावेळाने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. धारपूर येथील जीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली.
अनिल हा एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्याबाबत ही घटना घडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रॅगिंग करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वसतीगृहातून निलंबित करण्यात आले आहे. रैंगिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने डॉ. शॉ यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने रॅगिंग प्रकरणी २६ विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविले. त्यातील ११ एमबीबीएसच्या प्रथम वर्षात व १५ जण एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे आहेत.
eduvarta@gmail.com