जेईई मेन्सच्या अर्जासाठी मुदतवाढ मिळणार ?; एनटीएने विद्यार्थ्यांना दिल्या 'या' सूचना
दुरूस्ती विंडोमध्ये उमेदवारांना त्यांचा मोबाईल नंबर, ई-मेल पत्ता, कायम/सध्याचा पत्ता, आपत्कालीन संपर्क तपशील आणि फोटो बदलण्याची परवानगी नाही. तसेच फॉर्ममधील बदलांमुळे अर्जाची फी वाढल्यास, दुरूस्तीच्या वेळी उमेदवारांना तेच भरावे लागेल, आणि फी भरल्यानंतरच फील्ड अपडेट केले जातील. तथापि, दुरुस्तीनंतर फी कमी झाल्यास, एजन्सी उमेदवारांना पैसे परत करणार नाही, असे NTA ने स्पष्ट केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जेईई मेनसाठी (JEE Main 2025) अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना काही विद्यार्थ्यांकडून (students) ही मुदत वाढवण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) त्यांच्या https://jeemain.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर निवेदन जाहीर करत विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना केली आहे.
"संयुक्त प्रवेश परीक्षा (Joint Entrance Examination) JEE Main 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर आहे आणि ही अंतिम मुदत पुढे वाढवली जाणार नाही.(registration no extension of last date to apply) तथापि, ज्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज केला आहे आणि त्यांच्या फॉर्ममध्ये बदल करणे आवश्यक आहे त्यांना 26 ते 27 नोव्हेंबर दरम्यान दुरुस्ती विंडो उघडली जाईल," असे NTA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
जेईई मेन 2025 (सत्र 1) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सध्या खुली असून 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याबरोबरच, NTA ने सत्रनिहाय परीक्षेच्या तारखा, परीक्षेच्या शहरांच्या निवडीसाठी मार्गदर्शक तत्त्वे, प्रातिनिधिक प्रवेशपत्राशी संबंधित समस्या हाताळणे इत्यादी विषयांवर महत्त्वपूर्ण अपडेट्स दिले आहेत.
दुरूस्ती विंडोमध्ये उमेदवारांना त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, कायम/सध्याचा पत्ता, आपत्कालीन संपर्क तपशील आणि फोटो बदलण्याची परवानगी नाही. तसेच फॉर्ममधील बदलांमुळे अर्जाची फी वाढल्यास, दुरूस्तीच्या वेळी उमेदवारांना तेच भरावे लागेल, आणि फी भरल्यानंतरच फील्ड अपडेट केले जातील. तथापि, दुरुस्तीनंतर फी कमी झाल्यास, एजन्सी उमेदवारांना पैसे परत करणार नाही, असे NTA ने स्पष्ट केले आहे.
उमेदवार नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, इयत्ता 10/समतुल्य तपशील, इयत्ता 12/समतुल्य तपशील, पॅन क्रमांक, जन्मतारीख, लिंग, सामाजिक वर्ग, उप श्रेणी, अक्षम स्थिती, स्वाक्षरी उमेदवार पेपरचे प्राधान्य, परीक्षेचे माध्यम आणि परीक्षा शहर यापैकी कोणत्याही एका तपशीलात बदल करू शकतात.
eduvarta@gmail.com