ICSE Board Exam Pattern : CISCE बोर्डाचा मोठा निर्णय ; आता विद्यार्थ्यांना फेर परीक्षा देता येणार नाही

CISCE board News : कंपार्टमेंट परीक्षे ऐवजी करणार उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन

ICSE Board Exam Pattern : CISCE बोर्डाचा मोठा निर्णय ; आता विद्यार्थ्यांना फेर परीक्षा देता येणार नाही
CISCE Board Exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

CISCE Board Exam Pattern News : काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) ने ICSE च्या 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा पद्धतीत महत्वपूर्ण बदल केला आहे. CISCE ने 12 वी बोर्ड परीक्षा 2024 च्या कंपार्टमेंट परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याऐवजी त्यांनी उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बोर्डाच्या या निर्णयामुळे आता नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट (फेर) होणाऱ्या परीक्षा देता येणार नाही. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करून घेता येणार आहे. CISCE परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनासाठी उमेदवारांना प्रति विषय दीड हजार रुपये भरावे लागतील.

उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (ICSE) आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र (ISC) पुनर्मूल्यांकनाचे निकाल भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर तीन आठवड्यांच्या आत घोषित केले जातील. 

हेही वाचा : कोण म्हणतं... गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापकर भरती रद्द होणार ?

दरम्यान ICSE बोर्डाच्या इयत्ता 10 वी-12 वी परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cisce.org वरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. वेळापत्रकानुसार, इयत्ता 10 वी किंवा ICSE बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारीला इंग्रजी भाषेच्या पेपरने सुरू होतील आणि 28 मार्चला कला पेपर ने संपतील. 

इयत्ता 12 वी बोर्डाच्या परीक्षा 12 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 3 एप्रिल 2024 रोजी संपतील. परीक्षा सर्व दिवस दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी 3 तासांचा असेल, असे बोर्डाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.