PCMC News : ... तो हट्ट त्यांच्या जीवावर बेतला : काय घडले देवगडच्या समुद्र किणाऱ्यावर ?

पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील सैनिक अकॅडमीचे ६ विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.

PCMC News : ... तो हट्ट त्यांच्या जीवावर बेतला : काय घडले देवगडच्या समुद्र किणाऱ्यावर ?
Devgad

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

PCMC News : पिंपरी-चिंचवड येथील सैनिक अकॅडमीचे 6 विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. अकॅडमीचे 35 विद्यार्थी सहलीसाठी गेले होते. देवगड समुद्र किणाऱ्यावर हे सर्व विद्यार्थी समुद्रात पोहले. मात्र, त्यातील सहा जणांनी पुन्हा समुद्रात पोहण्याचा हट्ट धरला. त्यावेळी समुद्राला भर्ती आल्यामुळे हे विद्यार्थी समुद्रात बुडाले. त्यांचा पुन्हा पोहण्याचा हट्ट त्यांच्या जीवावर बेतला. 

शनिवारी दुपारी 2.00 वाजता कुणकेश्वर येथुन देवदर्शन व जेवण करुन देवगड पवनचक्की येथे फिरुन देवगड बिच येथे ही सहल पोहचली होती. सर्व प्रशिक्षणार्थी देवगड बिच येथील समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. त्यानंतर अर्ध्या तासाने सर्व प्रशिक्षणार्थी पाण्यातुन बाहेर आले होती. मात्र, प्रेरणा डोंगरे, अनिशा पवळ, पायल बनसोडे, अंकिता गालटे, आकाश सोमाजी तुपे, राम डिचोलकर हे पुन्हा पाण्यात उतरले.

हेही वाचा : देवगड समुद्रकिना-यावर पुण्यातील चार विद्यार्थ्यांचे मृतदेह

यावेळी समुद्राला भर्ती आलेली होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात बुडत असल्याचे दिसुन आल्याने किणाऱ्यावरील इतर विद्यार्थी व अकॅडमीचे संचालक नितीन गंगाधर माने यांनी समुद्राच्या किना-यावरील दोरी टाकुन आकाश सोमाजी तुपे याला बाहेर काढले. मात्र, इतर पाच जण पाण्यात वाहत गेले. त्यावेळी माने यांनी 100 नंबरवर फोन करून तात्काळ पोलिसांना माहिती दिली. 

हेही वाचा : ICSE Board Exam Pattern : CISCE बोर्डाचा मोठा निर्णय ; आता विद्यार्थ्यांना फेर परीक्षा देता येणार नाही

पोलिसांनी वेळीच समुद्र किणाऱ्यावर बोटींसह धाव घेतली. पोलिसांच्या आणि गावकऱ्यांच्या मदतीने प्रेरणा डोंगरे, अनिशा पवळ, पायल बनसोडे, अंकिता गालटे, या मुलींना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी या मुलींना मृत घोषीत केले. तर राम डिचोलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे. देवगडच्या समुद्रकिना-यावर दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती अकॅडमीचे संचालक माने यांनी पोलिसांना आपल्या जबाबात दिली आहे . पुन्हा पोहण्याचा हट्ट हा मुलांच्या जीवार बेतला, या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.