कोण म्हणतं... गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापक भरती रद्द होणार ? 

भरतीला शासनाकडून मान्यता दिली जाणार नसल्याचे बोलले जात आहे.परंतु, विद्यापीठाकडून करण्यात आलेली भरती रद्द होणार नाही.

कोण म्हणतं... गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापक भरती रद्द होणार ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शासनाच्या मान्यतेने गोंडवाना विद्यापीठातील (Gondwana University) प्राध्यापक भारतीची ( professor recruitment) प्रक्रिया विद्यापीठ स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे.  मात्र, या भरतीला शासनाकडून मान्यता दिली जाणार नसल्याचे बोलले जात आहे.परंतु, विद्यापीठाकडून करण्यात आलेली भरती रद्द होणार नाही.तर भरतीच्या मान्यतेच्या प्रस्तावात असलेल्या त्रुटी दूर करून मान्यतेचा प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे आदेश विद्यापीठाला देण्यात आलेले आहेत.त्यामुळे गोंडवाना  विद्यापीठाची प्राध्यापक भरती रद्द होणार ही केवळ अफवा असल्याचे उच्च शिक्षण विभागातील उच्च पदस्त आधिकाऱ्यांकडून (High ranking officers of the Higher Education Department) सांगितले जात आहे.

हेही वाचा : देवगड समुद्रकिना-यावर पुण्यातील चार विद्यार्थ्यांचे मृतदेह

राज्यातील सर्व विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त पदाची भरती करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली.त्यानुसार गोंडावाना विद्यापीठाने भारती प्रक्रिया राबवली. परंतु, पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर सुमारे तीन महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरीही विद्यापीठाकडून उमेदवारांच्या नियुक्तीची घोषणा केली जात नसल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आले.या भरती प्रक्रियेवर शिक्षण वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगली.त्यानंतर उशीरा का होईना विद्यापीठाकडून रिक्त पदावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली.परंतु, काही उमेदवारांनी त्यावर आक्षेतप घेत  शासनाकडे लेखी तक्रार केली.त्यामुळे ही भरती रद्द होईल,असे अनेकांना वाटत आहे.मात्र ,तशी कोणतीही शक्यता नसल्याचे उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले. 

विद्यापीठाकडून भरती प्रक्रिया राबवली गेली असली तरी त्यास शासनाची अंतिम मान्यता घ्यावी लागते.त्यासाठीचा प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर करावा लागतो. संबंधित प्रस्ताव अचूक असणे अपेक्षित असते.त्यात त्रुटी असल्यास तो प्राप्ताव पुन्हा सादर करण्याबाबत सूचना दिल्या जातात.त्याचप्रमाणे सध्या गोंडावाना विद्यापीठाला प्रस्ताव पुन्हा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्याचा अर्थ भरती रद्द करण्यात आली असा घेता येणार नाही.त्रुटी पूर्ततेसह प्राप्त झालेला प्रस्ताव सहसंचालक कार्यालयकांडून उच्च शिक्षण संचालक आणि उच्च संचालक कार्यालयाकडून मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवला जाणार आहे,असेही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.