अकरावी प्रवेश प्रक्रिया! विद्यार्थ्यांना उद्यापासून नोंदवता येणार पसंतीक्रम.. 

विद्यार्थ्यांना ५ जूनपासून अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. या दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजांमध्ये प्रवेश हवा आहे, असे दहा पसंतीक्रम भरता येतील.

अकरावी प्रवेश प्रक्रिया! विद्यार्थ्यांना उद्यापासून नोंदवता येणार पसंतीक्रम.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या (11th Admission Procedure) दुसऱ्या टप्प्याला  बुधवार (दि. ५) जूनपासून सुरूवात होणार आहे. या टप्प्यात विद्याथ्यर्थ्यांना त्यांना प्रवेश हवा असलेल्या कॉलेजांचा पसंतीक्रम (Preference of colleges) द्यावा लागणार आहे. ऑनलाइन स्वरुपात हे पसंतीक्रम भरण्यासाठी १येत्या ५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने या प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ जूनपासून अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. (The second part of the application can be filled from June 5) या दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजांमध्ये प्रवेश हवा आहे, असे दहा पसंतीक्रम भरता येतील.

ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग अद्याप भरलेला नाही.त्यांना हा पहिला भागही या कालावधीत भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाईल. ज्या विद्याथ्यांच्या अर्जाच्या भाग-१ची पडताळणी झाली आहे, तेच विद्यार्थी भाग-२ भरू शकतील. याशिवाय, कोटा प्रवेशासाठीही विद्यार्थी ऑनलाइन पसंती नोंदवू शकतात. प्रथम भाग-१ भरला असल्यास त्यामध्ये या कालावधीत सुधारणाही करता येईल. नव्याने भरलेला अथवा दुरूस्त करून भाग-१ प्रमाणित केलेले विद्यार्थी लगेच भाग-२ भरू शकतात. येत्या १५ जूनला सायंकाळी ४ वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी येत्या १८ जून रोजी झाली आहे.त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. तसेच अर्जाचा भाग-२ लॉक केला जाईल. विद्यार्थ्यांना येत्या २१ जूनपर्यंत या यादीवर हरकती नोंदविता येतील. २६ जून रोजी विद्यार्थ्यांना ज्या विद्यालयात प्रवेश मिळाला आहे. त्यांची यादी संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. याशिवाय फेरीचे कटऑफ गुणही प्रदर्शित केले जातील. येत्या २६ ते २९ जून दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या कॉलेजांमध्ये आपला प्रवेश निश्चित करता येईल.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ जुलै रोजी दुसऱ्या नियमित फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर केल्या जातील. विविध कोटा अंतर्गत असलेल्या जागांसाठीची प्रवेश प्रक्रियादेखील याच कालावधीत पूर्ण केली जाईल. येत्या २ जुलै रोजी दुसरी नियमित प्रवेश फेरी तर ९ जुलै रोजी तिसरी नियमित फेरी आणि  १९ जुलै रोजी विशेष प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. या फेऱ्यांचे तपशीलवार वेळापत्रकनंतर घोषित केले जाणार आहे.