शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरूंच्या कारने 6 जणांना चिरडले, अपघातात मृत्यू प्र-कुलगुरूंचा मृत्यू

कोल्हापूरच्या सायबर चौकात शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांच्या कारने ६ जणांना चिरडले. यामध्ये आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरूंच्या कारने 6 जणांना चिरडले, अपघातात मृत्यू प्र-कुलगुरूंचा मृत्यू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कोल्हापूरच्या सायबर चौकात शिवाजी विद्यापीठाचे (Shivaji University Kolhapur) माजी प्र- कुलगुरू व्ही. एम. चव्हाण (Former Vice Chancellor V. M. Chavan) यांच्या कारने ६ जणांना चिरडले. हा अपघात (Kolhapur car accident) एवढा भयानक होता की, ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर  ३ जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात माजी प्र कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांचा देखील मृत्यू झालाय. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हे फुटेज अंगावर काटा आणणारे आहेत.

कोल्हापुरातील सायबर चौकात एका भरधाव गाडीने ६ जणांना चिरडले. यामध्ये आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी आहेत. एका चारचाकी गाडीने चार दुचाकीस्वारांना धडक दिली असून यामध्ये दोन दुचाकीस्वार आणि ज्या कारने धडक दिली त्याचे चालक वसंत चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सहा जणांना चिरडणारी ती कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कलुगुरुंची असल्याची माहिती समोर आली आहे. 

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांच्या कारने कोल्हापूरच्या सायबर चौकात दुचाकींना धडक दिली. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. या अपघाताची दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहेत. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही एम चव्हाण यांची तब्येत बरी नव्हती. तरीदेखील त्यांनी कार चालवल्याची माहिती समोर येत आहे. प्र कुलगुरुंचा कार चालवत असताना कारवरील ताबा सुटला होता. त्यामुळे ही कार थेट दुचाकींवर जावून धडकली. या गाडीने सहा जणांना अक्षरश: चिरडले. अपघात इतका भीषण होता की, कार चालवणारे प्र कुलगुरु यांचादेखील यात मृत्यू झाला. या अपघातात एकूण ३ जण गंभीर जखमी झाले. तर ३ जणांचा मृत्यू झाला. पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

या अपघातातील कार चालक असलेले वसंत चव्हाण हे आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. कारचे चालक वसंत चव्हाण यांच्या नातेवाईकांची पोलीस चौकशी करत असून त्यांना कोणता आजार होता का ? याची देखील तपासणी पोलीस करत आहेत. या अपघातातील जखमींना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालय त्याचबरोबर सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.