तीन हजार शिक्षक प्रशिक्षक संस्थांवर गदा ; NCET कारवाईच्या तयारीत
वारंवार विनंती करूनही जवळपास तीन हजार संस्थांनी अहवाल सादर केलेला नाही आणि आता एनसीटीई अहवाल सादर न करणाऱ्या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 'काही संस्थांबद्दल तक्रारी आल्या होत्या की फक्त विद्यार्थ्यांची नोंदणी होते पण तिथे पायाभूत सुविधा नाहीत किंवा शिक्षकही नाहीत', अशी माहिती NCET ने दिली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वारंवार विनंती करूनही जवळपास तीन हजार संस्थांनी अहवाल सादर केलेला नाही आणि आता एनसीटीईने अहवाल सादर न करणाऱ्या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 'काही संस्थांबद्दल तक्रारी आल्या होत्या की फक्त विद्यार्थ्यांची नोंदणी होते. पण तिथे पायाभूत सुविधा नाहीत किंवा शिक्षकही नाहीत', अशी माहिती NCET ने दिली आहे.
या संदर्भात बोलताना एनसीटीईचे अध्यक्ष प्रा. पंकज अरोरा म्हणाले, 'ज्या शिक्षण संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहेत. त्यांना १५ दिवसांच्या आत उत्तर द्यावे लागेल. पुढील आठवड्यापर्यंत अशा सर्व संस्थांना सूचना पाठवल्या जातील. एनसीटीई कायदा, १९९३ च्या कलम १७(१) अंतर्गत या नोटिसा पाठवल्या जात आहेत.'
प्रा. अरोरा म्हणाले की, "आता देशात अध्यापन शिक्षणात मोठ्या बदलांसाठी एक ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशींनुसार, शिक्षण शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आता दूर केल्या जात आहेत. एनसीटीई कडून ऑनलाइन तपासणी केली जाते. ज्या संस्थांनी अहवाल पाठवला नाही, त्या संस्थांमध्ये विविध प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जात असल्याचे कागदावर नमूद आहे, परंतु, या संस्था नियमांचे पालन न करता चालवल्या जात आहेत का? याची चौकशी केली जात आहे."