JEE Advanced २०२५ प्रवेशपत्र प्रसिद्ध
प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जेईई (अॅडव्हान्स्ड) २०२५ चा रोल नंबर, जेईई (मुख्य) अर्ज क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी, जन्मतारीख, पत्रव्यवहाराचा पत्ता आणि श्रेणी. याशिवाय, उमेदवाराला देण्यात आलेल्या परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता देखील प्रवेशपत्रावर नमूद केला जाईल.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. आयआयटी कानपूर १८ मे २०२५ रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल, ज्यामध्ये पहिला पेपर सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरा पेपर दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत असेल. परीक्षा केंद्राची माहिती प्रवेशपत्रात उपलब्ध असेल.
हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?
* सर्वप्रथम जेईई अॅडव्हान्स्डची अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.
* होम पेजवर उपलब्ध असलेल्या जेईई अॅडव्हान्स्ड हॉल तिकीट २०२५ लिंकवर क्लिक करा.
* एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.
* सबमिट वर क्लिक करा आणि तुमचे हॉल तिकीट दिसेल.
* हॉल तिकीट तपासा आणि ते डाउनलोड करा.
* भविष्यातील वापरासाठी त्याची एक हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.