11th Admission : अकरावी विशेष फेरीला आजपासून सुरूवात
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. सर्वांसाठी खुल्या फेरीत कॅप अंतर्गत तीन लाख १९ हजार ५८२ इतक्या, तर कोटद्वामध्ये (व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा) पाच हजार १७९ इतक्या विद्याध्यर्थ्यांचे प्रवेश झाले आहेत आता अकरावीच्या प्रवेशासाठी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून (11th online admission process) अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी आता विशेष फेरी (Special ferry schedule) राबवली जाणार आहे. आज मंगळवार १२ ऑगस्टपासून या विशेष फेरीला सुरूवात होणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी खुली (ओपन टू ऑल) फेरी सोमवारी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी संपली या फेरीत एकूण तीन लाख २४ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत.
विशेष फेरी मंगळवार १२ ऑगस्टपासून सुरू होत असून १३ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना नोंदणी आणि भाग एकमध्ये दुरूस्ती करता येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. सर्वांसाठी खुल्या फेरीत कॅप अंतर्गत तीन लाख १९ हजार ५८२ इतक्या, तर कोटद्वामध्ये (व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा) पाच हजार १७९ इतक्या विद्याध्यर्थ्यांचे प्रवेश झाले आहेत आता अकरावीच्या प्रवेशासाठी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे.
विशेष फेरीचे वेळापत्रक -
१२ ते १३ ऑगस्ट - नवीन विद्यार्थी नोंदणी अर्जाचा भाग एक दुरूस्ती करणे, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या इच्छेनुसार (व्यवस्थापन, अल्पसंख्याक) कोट्यातील जागा प्रत्यार्पित करणे.
१४ ऑगस्ट रोजी - विशेष फेरीसाठी पोर्टलवर रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
१९ ऑगस्ट रोजी - विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे, भरलेल्या अर्जात दुरुस्ती करणे, राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी आणि प्रवेश अर्ज करता येणार आहेत.
१९ ते २० ऑगस्ट - विशेष फेरीमध्ये अलाॅटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.
eduvarta@gmail.com