IIT, IIMs मधील १३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी लोकसभेत बसप सदस्य रितेश पांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही आकडेवारी दिली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अवघड प्रवेश परीक्षा देऊन, त्यात उत्तीर्ण होऊन, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) सारख्या संस्थांमधून शिक्षण घ्यायचे, अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. पण गेल्या पाच वर्षांत, केंद्रीय विद्यापीठे, IIT, IIMs मधील आरक्षित संवर्गातील १३ हजार ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण थांबवले (stop taking education) असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार (Union Minister of State for Education Subhash Sarkar) यांनी लोकसभेत बसप सदस्य रितेश पांडे (BSP member Ritesh Pandey) यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही आकडेवारी दिली.
केंद्रीय विद्यापीठांबाबत (सीयू) सरकार यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत एकूण ४ हजार ५९६ ओबीसी, २ हजार, ४२४ एससी आणि २ हजार, ६२२ एसटी संवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास सोडला आहे. यापैकी आयआयटीमध्ये २ हजार ६६ ओबीसी, १ हजार ६८, एससी आणि ४०८ एसटी संवर्गाचे विद्यार्थी बाहेर पडले. तर आयआयएममध्ये ओबीसी, एससी आणि एसटीचे विद्यार्थी बाहेर पडले. तर IIM मध्ये, OBC, SC आणि ST विद्यार्थ्यांची संबंधित आकडेवारी अनुक्रमे १६३ व १८८ आणि ९१ होती. आरक्षित संवर्गातील १३,६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय विद्यापीठे, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि IIM मध्ये त्यांचे शिक्षण बंद केले.
सरकार यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांकडे उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक पर्याय आहेत. ते वेगवेगळ्या संस्थांमधून आणि एकाच संस्थेतील एका कोर्स/प्रोग्राममधून दुसऱ्या अभ्यासक्रमात जाण्याचा पर्याय स्वीकारतात.