मुंबई विद्यापीठ : पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून होणार सुरुवात

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पदव्युत्तर प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २२ मे पासून  सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन अर्ज करता येईल.

मुंबई विद्यापीठ : पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून होणार सुरुवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर (Post Graduate Course Admission Schedule Announced) केले आहे. विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये (Academic year 2024-25) पदव्युत्तर प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २२ मे पासून  सुरू (Pre-admission online name registration process will start from 22nd May) करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. तसेच विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केले आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे 

विद्यार्थ्यांना २२ मे ते १५ जून पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर करता येणार आहेत. विद्यापीठातील विविध विभागांमार्फत २० जून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणी पुर्ण झाल्यानंतर २१ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना काही तक्रारी असतील तर २५ जून दुपारी १ वाजेपर्यंत करता येतील. २६ जून रोजी संध्याकाळी पहिली अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. २७ जून ते १ जुलै दरम्यान ऑनलाईन शुल्क भरता येईल. २ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल तर ३ ते ५ जुलै दरम्यान शुल्क भरता येईल. १ जुलैपासून वर्ग सुरु होणार आहेत.

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 25 मे 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे.