pariksha pe charcha : 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा; शिक्षण विभागाचे आदेश

याबाबत उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत संचालक कार्यालयास सादर करण्याबाबत दक्षता घ्यावी.

pariksha pe charcha : 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा; शिक्षण विभागाचे आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर येत्या 29 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 'परीक्षा पे चर्चा 2024' (pariksha pe charcha-2024) या उपक्रमांतर्गत देशभरातील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी संवाद (Communication with students, teachers, parents)साधणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडिओ / ऑडिओ स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल याबाबतची खबरदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी (Director of Primary Education Sharad Gosavi)यांनी दिल्या आहेत.

विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत आणि या भावी राष्ट्रनिर्मात्यांसाठी शिक्षण हे अधिक आनंदी आहे आणि कमी तणावपूर्ण बनविण्यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार परीक्षांचा उत्सव अर्थात 'परीक्षा पे चर्चा २०२४' साजरा केला जात आहे. त्यामुळे संबंधितांनी याबाबत उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत संचालक कार्यालयास सादर करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे परिपत्रक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा : ICAI - CA अंतिम परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द

राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये संगणक,  दूरचित्रवाणी तसेच मोठ्या स्क्रीन बसवण्याची आवश्यक व्यवस्था करण्याबाबत संबंधित मुख्याध्यापकांना आवश्यक निर्देश द्यावेत. शाळांमध्ये टीव्ही आणि लाईट जोडण्याबाबत काही अडचणी आल्यास त्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे थेट भाषण पाहता / ऐकता येईल ; याची खात्री करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणांची समन्वय साधन जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांची थेट प्रक्षेपण पाहू/ ऐकू शकतील, अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे. कार्यक्रमानंतर कार्यक्रम पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे आणि तपशील माय गव्हर्मेंट या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.

अतिदुर्गम भागात जेथे दूरचित्रवाणी संच सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी रेडिओची व्यवस्था करावी. यासंदर्भात समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध निधीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तथा इतर अनुदानित शाळांना टीव्ही किंवा इतर उपकरणे भाड्याने घेणे आणि इतर व्यवस्था करण्यासाठी वापरता येऊ शकतो.