UGC NET : जून 2024 साठी नोंदणी प्रक्रिया सुरु

इच्छुक उमेदवार UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac वर  ज्या अधिकृतपणे अर्ज करू शकतात.

UGC NET : जून 2024 साठी नोंदणी  प्रक्रिया सुरु

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC NET 2024) २०२४ साठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू (Start the registration process) केली आहे. NTA ने नोंदणी लिंक सक्रिया केली असून इच्छुक उमेदवार UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac वर अधिकृतपणे अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2024 आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 12 मे आहे. दुरुस्ती विंडो 13 मे रोजी उघडेल आणि 15 मे 2024 रोजी बंद होईल. 

अधिकृत सूचनेनुसार, परीक्षा 16 जून 2024 रोजी घेतली जाईल. UGC NET जून 2024 परीक्षा केवळ संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये एक किंवा अधिक शिफ्टमध्ये घेतली जाईल. यात दोन पेपर असतील, दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ प्रकारचे, बहु पर्याय प्रश्न असतील. उमेदवारांना दोन्ही पेपरसाठी एकूण तीन तासांचा कालावधी दिला जाईल, ज्यामध्ये एकूण 150 प्रश्न असतील. 

अर्ज कसा करावा

UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या UGC NET जून 2024 लिंकवर क्लिक करा. स्वतःची नोंदणी करा आणि आपल्या अकाउंटला लॉग इन करा. अर्ज भरा आणि अर्ज फी भरा. सबमिट वर क्लिक करा आणि  अर्जाची प्रिंट काढून ठेवा.