विद्यापीठाच्या परीक्षांना 23 तारखेपासून सुरू; काय आहे वेळापत्रक, जूनमध्येच निकाल जाहीर करणार 

विद्यापीठाच्या महत्त्वाच्या परीक्षा येत्या 23 एप्रिलपासून सुरू होत आहेत.त्यामुळे युजीसीच्या निर्देशानुसार नियोजित वेळेत निकाल जाहीर करणे शक्य असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या परीक्षांना 23 तारखेपासून सुरू; काय आहे वेळापत्रक, जूनमध्येच निकाल जाहीर करणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission)सर्व विद्यापीठांना जून महिन्यांचा निकाल जाहीर (Results for the month of June announced)करावेत आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालये सुरू करावेत,अशा सूचना दिल्या आहेत.त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा (Savitribai Phule Pune University Exams)नुकत्याच सुरू झाल्या असून महत्त्वाच्या परीक्षा येत्या 23 एप्रिलपासून सुरू होत आहेत.त्यामुळे युजीसीच्या निर्देशानुसार नियोजित वेळेत निकाल जाहीर करणे शक्य असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे (Director of Examination Board Dr. Mahesh Kakade)यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे,आदमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या माध्यमातून घेतली जाते.विद्यापीठाने सर्व परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे.त्यानुसार येत्या 23 एप्रिलपासून द्वितीय व तृतीय कला ,वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा सुरू होणार आहेत.तर पदव्युत्तर पदवी विद्यान शाखा (एम.एस्सी.) अभ्यासक्रमाच्या परीक्षा 14 मे पासून सुरू होणार आहेत. तसेच इंजिनिअरिंगच्या परीक्षा 15 व 16 मे पासून सुरू होणार आहेत.फार्मसी, बीबीए, एमबीए, विधी आदी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही प्रसिद्ध झाले आहे. 

विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे, विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज वेळेत आहेत आहेत.तसेच काही परीक्षा सुरू झाल्या असून महत्त्वाच्या परीक्षांना येत्या 23 तारखेपासून सुरूवात होत आहे.कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेबरोबर सर्वांच्या सहकार्याने निकालही वेळेत लावण्याच्या विद्यापीठाचा प्रयत्न आहे.त्यामुळे कोरोनामूळे विस्कळीत झालेले शैक्षणिक कॅलेंडर रुळावर येईल. 
------------------------------------------