सावधान : परदेशी नोकरी करू इच्छिणाऱ्यांची होतीये फसवणूक 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिला इशारा 

सावधान : परदेशी नोकरी करू इच्छिणाऱ्यांची होतीये फसवणूक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, मजकूर संदेश आणि अशा इतर माध्यमांसह विविध सोशल मीडिया साइट्सद्वारे परदेशात नोकरीचे (Job abroad)अमिश दाखवून युवकांची फसवणूक (Deception of youth) करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सावधानतेचा इशारा (Ministry of External Affairs warned of caution) दिला आहे. परदेशी नोकऱ्यांसाठी अर्ज करताना नोंदणीकृत रिक्रूटमेंट एजंट्स (RAs) च्या सुरक्षित आणि कायदेशीर सेवांचा वापर करण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नोंदणी नसलेल्या रिक्रूटमेंट एजंट्सकडून बनावट नोकरीच्या ऑफरद्वारे आणि २-५ लाख रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारून परदेशी नोकरी शोधणाऱ्यांची फसवणूक होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हे अवैध एजंट परराष्ट्र मंत्रालयाकडून परवाना न घेता काम करतात. हे एजंट विविध सोशल मीडिया साइट्सद्वारे कार्य करतात आणि त्यांचा ठावठिकाणा आणि संपर्कांबद्दल थोडे तपशील देतात. ते साधारणपणे फक्त WhatsApp द्वारे संवाढ साधतात.  ज्यामुळे कॉलरचे स्थान आणि ओळख आणि जॉब ऑफरची वास्तविकता शोधणे कठीण होते.

हेही वाचा : मोठी बातमी : सततच्या पेपर फुटी प्रकरणात सरकारचे मोठे पाऊल : समिती स्थापन

परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, "अनेक पूर्व युरोपीय देश, काही आखाती देश, मध्य आशियाई देश, कॅनडा, म्यानमार आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, इस्रायलमध्ये कामासाठी भरतीसाठी अशी प्रकरणे नोंदवली जात आहेत."