सुसंस्कृत, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची पिढी तयार करा, साधू संतांच्या विचारांचा समाज घडवा; अजित पवार
शाळेच्या शैक्षणिक कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व शिक्षकांनी काम करावे. या शाळेमधून उत्तमातील उत्तम मुले भविष्यात तयार झाली पाहिजे यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे. जगात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. सातारा जिल्ह्यात औंध, खटावमधील मुलांना एआयचे शिक्षण घेता यावे अडीच एकर परिसरामध्ये दिमाखदार इमारत उभारण्यासाठी सर्वजन मिळून प्रयत्न करू, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आजचा काळ बदललेला आहे, या बदललेल्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे (Artificial Intelligence) शिक्षण घेणे गरजेचे होत आहे. औंधसारख्या सुंदर परिसरात उभारलेल्या नूतन शाळेमधून सुसंस्कृत, निर्व्यसनी विद्यार्थ्यांची पिढी तयार करून साधू संतांच्या विचाराचा समाज घडवावा, यासाठी सर्व शिक्षकांनी व शाळेतील प्रत्येक घटकांनी इच्छाशक्ती दाखवावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar, Chairman of Aundh Education Board) यांनी केले. औंध शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलाच्या श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या (Shrimant Harshitaraje English Medium High School) नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्यावेळी बहुजन समाजातील गोरगरीब व मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडली नव्हती शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यावेळी श्रीमंत भगवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी शैक्षणिक प्रगती घडवून आणली. या शाळेमध्ये साने गुरुजी, ग. दि.माडगूळकर,शंकरराव खरात, किर्लोस्कर यासारख्या महान व्यक्तींनी शिक्षण घेतले आहे. आता काळ बदललेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारखे आधुनिक प्रकारचे शिक्षण आताच्या पिढीला देण्याची गरज झाली आहे.
शाळेच्या शैक्षणिक कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व शिक्षकांनी काम करावे. या शाळेमधून उत्तमातील उत्तम मुले भविष्यात तयार झाली पाहिजे यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे. जगात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. सातारा जिल्ह्यात औंध, खटावमधील मुलांना एआयचे शिक्षण घेता यावे अडीच एकर परिसरामध्ये दिमाखदार इमारत उभारण्यासाठी सर्वजन मिळून प्रयत्न करू, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.
eduvarta@gmail.com