जातीवादामुळे कागदपत्रे तपासण्यास नकार; आंबेडकरांचे पुण्यातील मॅडर्न काॅलेजवर गंभीर आरोप

नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून यूकेपर्यंत शिक्षणाचा खडतर प्रवास केलेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरूणाला नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी महाविद्यालयाने जात विचारली. विशेष म्हणजे, जेव्हा प्रेम लंडनला शिक्षणासाठी गेला होता, तेव्हा याच महाविद्यालयाने हे प्रमाणपत्र तपासणी करून दिले होते. आता नोकरीसाठी पुन्हा त्याच प्रमाणपत्राची मागणी केली असता, महाविद्यालयाने नकार दिल्याचे आंबेडकर म्हणाले.

जातीवादामुळे कागदपत्रे तपासण्यास नकार; आंबेडकरांचे पुण्यातील मॅडर्न काॅलेजवर गंभीर आरोप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ससेक्स विद्यापीठातून नुकत्याच पदवीधर झालेल्या प्रेम बिन्हाडे (Student Prem Binhade) या दलित तरुणाला लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील नोकरीची संधी गमवावी लागली. पुणे येथील त्याच्या पूर्वीच्या महाविद्यालयाने आवश्यक कागदपत्रे सादर करूनही त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र जातीमुळे तपासण्यास (Refusal to check documents) स्पष्ट नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. हा सर्व प्रकार पुण्यातील नामांकित मॅडर्न महाविद्यालयात (Modern College Pune) घडला असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी! पुण्यात रंगणार १३ ते २१ डिसेंबर रोजी भव्य 'पुस्तक महोत्सव'

नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून यूकेपर्यंत शिक्षणाचा खडतर प्रवास केलेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरूणाला नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी महाविद्यालयाने जात विचारली. विशेष म्हणजे, जेव्हा प्रेम लंडनला शिक्षणासाठी गेला होता, तेव्हा याच महाविद्यालयाने हे प्रमाणपत्र तपासणी करून दिले होते. आता नोकरीसाठी पुन्हा त्याच प्रमाणपत्राची मागणी केली असता, महाविद्यालयाने नकार दिल्याचे आंबेडकर म्हणाले.

प्रेम बिऱ्हाडेचे हे प्रकरण जातीय भेदभावाचे दुष्टचक्र कसे अजूनही दलित तरुणांना त्रास देत आहे, याचे ज्वलंत उदाहरण आहे. प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या एका होतकरू तरुणाला केवळ त्याच्या 'जाती'मुळे नोकरी गमवावी लागली आहे. प्रेमची ही कथा केवळ त्याची एकट्याची नसून, जातीय भेदभावामुळे ज्यांच्या महत्त्वाकांक्षा चिरडल्या जातात, अशा असंख्य दलित विद्यार्थ्यांची कथा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
_____________________________________________

महाविद्यालय किंवा येथील कर्मचाऱ्यांनी कधीही कोणत्या विद्यार्थ्याच्या जातीचा उल्लेख केलेला नाही, किंवा त्यावर चर्चा केलेली नाही. शैक्षणिक प्रमाणपत्र तपासने हे पूर्णपणे संस्थात्मक नियम आणि शिस्तभंगाच्या विचारांवर आधारित आहे. संबंधित विद्यार्थ्यी वारंवार चुकीची माहिती पसरवत आहे आणि विद्यार्थी संघटनांची दिशाभूल करत आहे. ज्यामुळे महाविद्यालयातील शांतता दुषीत करण्याचा व अधिकार्‍याची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे हे कृत्य डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बदनामी, सायबर छळ आणि चिथावणी देण्यासारखे आहे. 

डाॅ. निवेदिताएकबोडे, प्राचार्य, मॅडर्न महाविद्यालय, पुणे
_______________________________________________

“मी पुण्यातील मॉडर्नकॉलेजमध्ये शिकत होतो. कॉलेजने मान्य केले की त्यांना लंडनमधील कंपनीकडून ई-मेल मिळाला होता. त्यावर उत्तर देताना महाविद्यालयाने सांगितले की आज तुमचे काम होणार नाही, दोन दिवसांनी डॉक्युमेंटवेरिफिकेशन करू. मी दोन दिवसांनी जेव्हा पुन्हा चौकशी केली तेव्हा HOD लॉली दास यांनी कॉलेजच्याउपमुख्याध्यापिकासरदेसाईमॅडम यांच्याशी संपर्क साधायला सांगितले. सरदेसाईंनी उत्तर दिले, तू कॉलेजच्याHOD शी बोल, मला फोन करू नकोस. मग मी पुन्हा लॉली दास यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी तुझी जात कोणती? असा प्रश्न विचारला. आणि एक दिवसानंतर मला उत्तर मिळाले “मुख्याध्यापिकांच्या सूचनेनुसार आम्ही तुला रिकमंड करू शकत नाही. यावर मी म्हणालो, तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी मॉडर्नकॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. मग पुन्हा एकदा त्याने सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी उत्तर दिले की, कॉलेजमध्ये असताना तू बेशिस्त होतास, त्यामुळे आम्ही तुझी मदत करू शकत नाही."

प्रेम बिऱ्हाडे, विद्यार्थी