धक्कादायक: TET परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने मुख्याध्यापकाची आत्महत्या..
अलिकडेच शासनाच्या शिक्षण विभागाने कार्यरत शिक्षकांना टीईटीची सक्तीची केली आहे. कदम यांनी मागच्या वेळी टीईटीची परिक्षा दिली होती. मात्र, त्यात ते नापास झाले होते. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. त्यातच त्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामध्ये मुख्याध्यापक आनंद कदम यांचा जागीच मृत्यू झाला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सिंधूदूर्ग जिल्ह्यातील आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे (Zilla Parishad Primary School Amboli Village Thanwadi) मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम (Principal Anand Kadam) ( ३६) यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by hanging) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट (Suicide note) सापडली. ज्यात कदम यांनी "मी टीईटी परीक्षा पास (Passed TET Exam) होऊ शकलो नाही", असा उल्लेख करून आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. त्यामुळे कदम यांनी टीईटी परिक्षेत नापास झाल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महिला व बाल विकास विभागाचा प्रोबेशन ऑफिसर या पदाचा पेपर फुटला
अलिकडेच शासनाच्या शिक्षण विभागाने कार्यरत शिक्षकांना टीईटीची सक्तीची केली आहे. कदम यांनी मागच्या वेळी टीईटीची परिक्षा दिली होती. मात्र, त्यात ते नापास झाले होते. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. त्यातच त्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामध्ये मुख्याध्यापक आनंद कदम यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री कामावरून घरी परतलेल्या कदम यांच्या भावाने सहज खिडकीतून पाहिले असता त्यांना आनंद कदम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. दरवाजाला आतून कडी लावलेली होती. यानंतर त्यांनी तातडीने आंबोली पोलीस स्थानकात या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत बघितले असता कदम मृत पावले होते. आनंद कदम हे आंबोली गावठण वाडी येथील शाळेत मुख्याध्यापक होते. ते शिस्तप्रिय शिक्षक म्हणून सर्वत्र त्यांची ओळख होती, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
eduvarta@gmail.com