शिक्षक भरती: शिल्लक 10 टक्के जागांचे काय? पेसा क्षेत्रातील भरती केव्हा... 

पेसा क्षेत्राबाबत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

शिक्षक भरती: शिल्लक 10 टक्के जागांचे काय? पेसा क्षेत्रातील भरती केव्हा... 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जिल्हा परिषदेकडील (ZP)बिंदुनामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करुन शिक्षका भरण्यासाठी (Teacher Recruitment)शिल्लक ठेवलेल्या १० टक्के जागांबाबत संबंधित जिल्हयांकडून अहवाल घेण्यात येत आहेत, काही जिल्हयाचा अहवाल अप्राप्त आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रिक्त १० टक्के जागांबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल. त्याचाप्रमाणे पेसा क्षेत्रातील (pesa sector)भरती प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयानंतर केली जाईल,तसेच पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील,असे शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे (Circular by Education Department) स्पष्ट केले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून सुमारे 11 हजार शिक्षकांची पदे भरली आहेत.शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पदभरती याप्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे . तसेच  अभियोग्यताधारकांना त्यांच्या मागणीनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरी देखील यासंदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे edupavitra2022@gmail.com या ई-मेलवर तक्रार अर्ज सादर करता येईल. त्याचा नमुना तयार करण्यात आला असून News Bulletin मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या नमुन्यात आपला अर्ज त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. केवळ या ईमेलचाच वापर करावा. त्या ईमेलवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉटसअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये.

अनुसूचित जमातीच्या पेसा क्षेत्रातील १३ जिल्हयातील रिक्त जागांबाबत उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी यापुर्वीच पूर्ण झाली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची पदभरती पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदांवर रूजू होता येईल. तसेच पेसा क्षेत्राबाबत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गात नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्हयाकडे उपस्थित राहून करून घ्यावी.

भाषा विषय इंग्रजी साठी निवडलेल्या या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवायचे आहेत.उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू शिक्षक उपलब्ध आहेतच. केवळ एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे. यामुळे विध्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होतोय. त्यामुळे भाषा विषय अथवा सेमी इंग्रजी यासाठी वेळा विचार करण्याची गरज नाही.साधन व्यक्ती या पदासाठी शासन पत्र दिनांक २५/०१/२०२४ नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचेस्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

या भरतीमध्ये रिक्त राहिलेली पदे (माजी सैनिक, अंशकालीन इत्यादी) याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच नव्याने जाहिराती जेव्हा येतील तेथून पुढे टप्पा-२ मधील जाहिराती असतील.शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येतील. असेही शिक्षण विभागाने परिपत्रकात नमूद केले आहे.